आंतरभारती शिक्षण मंडळ, कोल्हापूर संचलित सदर बाजार येथील कोरगांवकर हायस्कूलच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नुकतीच आरोग्य तपासणी करणेत आली . आंतर भारती शिक्षण मंडळ आणि डॉ. डी.वाय. हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विविध गटांमध्ये विभागणी करून यामध्ये रक्त, शर्करा, अँजिओग्राफी, रक्तदाब, वजन, कोलेस्टेरॉल, क्ष किरण आदी दहा प्रकारच्या तपासणी करण्यात आली . या तपासणीमुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांची कार्यक्षमता तपासून धकाधकीच्या आणि ताण तणावाच्या जीवनात सर्व कर्मचारी अधिक तंदुरुस्त रहातील यासाठी हा उपक्रम असल्याचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी सांगितले . सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे तपासणी अहवाल पाहून त्यांना तंदुरुस्ती बाबत योग्य ती खबरदारी घेणे यामुळे सुकर झाल्याचेही त्यांनी सांगितले . कार्याध्यक्षा पल्लवी कोरगांवकर, अध्यक्षा सुचेता कोरगांवकर आणि सचिव एम एस् . पाटोळे यांनी संस्थेच्या अन्य शाखांमधुनही या उपक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केले . शिक्षणक्षेत्रात या उपक्रमाचे कौतुक होत आहे