आळोबानाथ जागरानिमित्त आयोजित कुस्ती मैदानात चटकदार शंभरहून अधिक कुस्त्या
सातवे (ता.पन्हाळा) येथील श्री आळोबानाथ जागरानिमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत ओमकार जाधव शाहू आखाडा कोल्हापूर या ने घिसा डावावर सौरभ पाटील राशिवडे यास आसमान दाखविले.
श्रीआळोबानाथ व भैरवनाथ जागरनिमित्त सातवे ग्रामपंचायतच्या वतीने हे कुस्ती मैदान आयोजित केले होते. डॉ.जयंत पाटील फाउंडेशन यांच्या वतीने प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी पैलवान ओमकार जाधव यास रोख रक्कम व मानाचा फेटा बांधून उपसरपंच उत्तम नंदुरकर व कुस्ती कमिटी अध्यक्ष आबासाहेब सकटे, शिक्षक नेते उत्तम पाटील, यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सुरुवातीस कुस्ती आखाड्याचे पूजन सरपंच कु, ऐश्वर्या कांबळे आबा सकटे,सोहम दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत करतार कांबळे मोतीबाग तालीम मंडळ कोल्हापूर व विजय बिचुकले गणेश तालीम मंडळ कोल्हापूर यांची कुस्ती 40 मिनिटांनी बरोबरीत सोडविण्यात आली, तर तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत प्रथमेश गुरव वारणा तालीम व रवी पाटील कोल्हापूर या लढतीत प्रथमेश गुरव यांनी मैदान गाजविले.यावेळी मैदानामध्ये लहान मोठ्या 100 पेक्षा अधिक कुस्त्या लावण्यात आल्या.
यावेळी मैदानातील विजयी पैलवान संतोष जाधव रोहन सकटे विराज मोरे रोहित चव्हाण देवराज खाडे नामदेव केसरे,अजय पाटील,, शुभम निकम(बोरपाडळे),सुरज कोळी(सातवे),रोहन पाटील, शिवप्रसाद कोळी,विशाल दिघे, सुशांत पाटील,प्रताप माने,ओंकार जाधव,गोरख पाटील,दत्ता बनकर आदींनी मैदानात चटकदार कुस्त्या केल्या.
पंच म्हणून पै.दीपक खाडे, आबासाहेब सकटे महादेव भेसाटे शंकर दबडे, रामचंद्र शेलार उत्तम पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष दत्ता चव्हाण,सदाशिव भोसले, मोहन पाटील यांनी काम केले.
यावेळी मैदानात ग्रा.प.सदस्य सतीश पोवार,आनंदा निकम ,कुस्तीपटू नेहा जाधव ,महेश जाधव,सयाजी गोरड, नामदेव कांबळे,संभाजी पाटील,विलास पाटील,विष्णू तोडकर,आळोबा गोरड,पै.आण्णा दत्तू शिंदे आदी उपस्थित होते.कुस्ती समालोचक सुरेश जाधव (चिंचोलकर) ,विजय बोरगे यांनी रांगड्या भाषेत समालोचन करून प्रेक्षकांची मने जिंकली.
फोटो ओळ: सातवे येथील डॉक्टर जयंत पाटील फाउंडेशन कोडोली यांच्या वतीने कुस्ती मैदानात कुस्ती लावताना विलास पाटील व शेजारी नामदेव कांबळे उत्तम नंदुरकर, उत्तम पाटील,आबा सकटे,दत्ता चव्हाण, आदी.