कोल्हापूर: इटली स्थित बहूराष्ट्रीय कंपनी टेक्नीमॉन्ट यांनी के.आय.टी. कॉलेज, कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मधील अंतिम वर्षातील विद्यार्थीनी कु.अवंती अनिल राजहंस हिला वार्षिक रू.६.५ लाखाचे पॅकेज मिळाले.
मुलाखतीमध्ये एकूण १००० विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्रथम अभियोग्यता चाचणी नंतर मुलाखत आणि सरतेशेवटी अंतीम निवड फेरी अशा तीन टप्प्यामध्ये कु.अंवती अनिल राजहंस हिची निवड झाली. याशिवाय कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे इतर सात विद्यार्थीही अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते.
या मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील सर, कॉलेजचे प्राचार्य चिदंबर दुदगीकर, प्रा. अंजली जाधव आणि प्रा.लौकिक दिगे यांचे मार्गदर्शन लाभले.