हेरले ग्रामपंचायत हेरले व जीवसृष्टी चॅरिटेबल ट्रस्ट हेरले यांच्या वतीने हातकणंगले तालुक्यात आगळा वेगळा उपक्रम राबवला जात असून सदर उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील अनेक गावकऱ्यांना होणार आहे. परिणामी सदर चारिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून परिसरात असणाऱ्या भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर लसीकरण केले जाते. परिणामी त्यांच्या वर योग्य तो औषधोपचार व लसीकरण करून त्यांना पुन्हा परिसरात सोडले जाते. या उपक्रमामुळे सदर कुत्र्यांचा नागरिकांना चावा झाल्यास त्यापासून कोणत्याही पद्धतीची इजा अथवा उपद्रव नागरिकांना होत नाही .तसेच मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची प्रजनन क्षमता घटत असल्याचे मत ही यावळी बोलताना व्यक्त करण्यात आले.
सदर उपक्रम हेले तसेच आज बाहुबली सह परिसरात राबविण्यात आला असून यावेळी 25 पेक्षा जास्त भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर लसीकरण करण्यात आले.परिणामी सदर उपक्रम हातकणंगले तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी राबवल्यास भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होऊन कुत्र्यांच्या पासून नागरिकांना होणाऱ्या त्रास किंवा कुत्री चावल्यानंतर होणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्याची परिस्थिती येणार नाही.त्यामुळे परिसरातील सर्वच ग्रामपंचायतींनी हेरले येथील जीवसृष्टी चॅरटेबल ट्रस्टची संपर्क साधण्याचे आव्हान चॅरिटेबल ट्रस्टचे डॉक्टर अमित चौगुले हेले व डॉक्टर शांतिनाथ चौगुले कुंभोज यांनी केले आहे.