कोल्हापूर दिनांक 22 – सध्या महाराष्ट्रात विधानसभे चे वारे जोरात वाहू लागले असून आज पासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत वारेमाप पैश्याचा वापर होत असल्याचे आरोप होताना दिसत असतात.त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर एका इनोवा गाडी मध्ये 5 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली असून एकच खळबळ उडाली आहे.सदरची रक्कम आमदार शहाजी पाटील यांची असल्याचा आरोप संजय राऊत यांनी एक्स वर ट्विटर द्वारे केला असून वादाला तोंड फुटले आहे.तरी शहाजी पाटील यांनी आपला या रकमेशी आपला काहीही संबंध नसल्याचे प्रसार माध्यमांमध्ये जाहीर केले आहे.त्यामुळे अजून किती रक्कम कुठे कुठे सापडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.