जयसिंगपूर येथील कर्मवीर मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या कुंभोज शाखेचे नुतनीकरण कार्यालयाचे उद्घाटन दक्षिण भारत जैन सभेचे खजिनदार व संस्थेचे चेअरमन मा.श्री अरविंद मजलेकर यांच्या अमृत हस्ते आणि महाराष्ट— राज्य पत संस्था फेडरेशनचे व कर्मवीर मल्टिस्टेट संस्थेचे संचालक मा. श्री सागर चौगुले यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी चेअरमन अरविंद मजलेकर म्हणाले, थोर शिक्षणमहर्षि कर्मवीर आण्णांच्या विचाराने चालवली जाणारी ही संस्था असल्याने ग्राहक व कर्जदार यांचे हित संस्थेने नेहमीच जोपासले आहे. 2002 साली कुंभोज शाखेचा 5 कोटी व्यवसाय असताना बांधलेली सवास्तु आज 50 कोटी व्यवसाय झालेने सभासद ग्राहकांना चांगली व अत्याधुनिक सेवा सुविधा देता यावी यासाठी या शाखेचे नूतनीकरण करून ग्राहकांच्या सेवेसाठी आज उपलब्ध करून दिले आहे. कुंभोज शाखेच्या माध्यमातून अनेक पाणीपुरवठा योजनेसाठी अर्थसहाय दिल्याने येथील कोरडवाहू जमिनी ओलिताखाली आली आहे. त्यामुळे अनेकांचे जीवनमान उंचावले आहे. संस्थेने सातत्याने 15 टक्के लाभांश सभासदांना दिले आहे तसेच झालेल्या नफ्यातून सुकन्या सन्मान योजना, वीराचार्य आधार योजना, कर्मवीर आधार योजनांच्या माध्यमातून सभासदांना विशेष आर्थिक मदत करण्यात येत आहे. संस्थेने नवीन तंत्रज्ञान स्वीकारले असून ते सभासदांच्या दारा पर्यंत पोहोचवण्यास यापुढील काळात कटिबद्ध राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सागर चौगुले म्हणाले, कर्मवीर संस्थेची स्थापनाच मुळात सावकारी पाशातून शेतकरी व छोटे व्यवसायिक यांना मुक्त करण्याच्या हेतूनेच केली आहे. आज पर्यंत संस्थेने अनेकांचे पत उंचावले आहे. संस्थेने नुकतेच पर्यावरण रक्षणार्थ, देश हिताचे, व ग्राहकांच्या सोईची असलेली सोलर कर्ज योजना सुरू केले आहे. यामध्येे शासनाकडून अनुदान जाहिर केलेल्या रुफ टफ सोलर योजनेत सहभागी ग्राहकांना माफक व्याज दराने कर्ज योजना आणली आहे. त्याचा कुंभोज परीसरातील ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच यावेळी श्री सुभाष देवमोरे, योगेश साजनकर, माजी सरपंच प्रकाश पाटील, यांनी संस्थेच्या अर्थसाहयामुळे त्यांच्या जीवनात झालेल्या प्रगती बाबत मनोगत व्यक्त करुन संस्थेच्या कामकाजाचे कौतुक केले.
या सोहळ्यासाठी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक करताना संचालक अनिल भोकरे म्हणाले कुंभोज गावात कर्मवीर अण्णांचे जन्म स्थळ आहे. या जन्मस्थळाची जागा कर्मवीर अण्णांचे स्मारक रूपाने विकसित करण्यासाठी संस्थेने संपादित केले आहे. त्यामुळे सर्व संचालक मंडळाचे धन्यवाद मानले. यावेळी जव्हार साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक आप्पासो चौगुले कुंभोज अर्बन संस्थेचे चेअरमन आप्पासो पाटील सुरेश हिंगलजे भाग्यलक्ष्मी पाणीपुरवठा चेअरमन बाबासो चौगुले कर्मवीर पाणीपुरवठा संचालक दुधेश्वर हिंगलजे व राजू तरस्कर दादासो पाटील यांचे सह कुंभोज परिसरातील सभासद, ग्राहक, हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच संस्थेचे व्हा.चेअरमन प्रा.आप्पा भगाटे यांनी मनोगत व्यक्त केले, संचालक, सुकुमार पाटील, आदिनाथ किणिंगे, भूपाल गिरमल, भरत गाट, कुमार पाटील, रमेश पाटील, भाऊसो पाटील, रावसोा पाटील, अमोल पाटील, अनिल गडकरी, पंकज ऐवाळे, सौ. उर्मिला मनोहर उपाध्ये, वीर सेवा दलाचे कार्याध्यक्ष सुभाष मगदूम, संस्थेचे सल्लागार अॅड संदीप चौगुले, अभिषेक पाटील, राकेश निल्ले, आदि उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार संचालक राजेंद्र नांदणे यांनी मानले.