कोल्हापूर दिनांक 22 – महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.तसेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून मात्र शनिवार रविवारी सुट्टी असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ 6 दिवस उमेदवारांना मिळणार आहेत.त्यामुळे आजपासून शिल्लक असलेल्या मतदार संघांमध्ये उमेदवार आज निश्चित केले जाण्याची शक्यता असून उमेदवारांची कागदपत्रांची जमवाजमव अंतिम टप्प्यात आली आहे.