किमान मुलभूत सुविधाबाबत खात्री करा
जेष्ठ, दिव्यांगांचे गृह मतदान शंभर टक्के यशस्वी करा
नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून कामे करा
274, 275 व 276 विधानसभा मतदारसंघामधील क्षेत्रीय अधिकारी, निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्त केलेले नोडल अधिकारी यांच्या बैठकीत सूचना
कोल्हापूर दि. 19 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीतील मतदानाची टक्केवारी गतवेळीपेक्षा वाढेल यासाठी स्वीप पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी जनजागृतीचे कामकाज करावे. यासाठी आवश्यक नियोजन करून स्वीप मोहीम गतीने राबविण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात 274 कोल्हापूर दक्षिण, 275 करवीर व 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामधील सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण करवीर हरिष धार्मिक, 275 करवीर च्या वर्षा शिंगण, 276 कोल्हापूर उत्तर चे डॉ. संपत खिलारी, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार स्वप्नील रावडे, करमणूक कर अधिकारी सैपन नदाफ यांच्यासह तीनही मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकारी, व निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्त केले नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, सर्वांनी निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी यांचेशी समन्वय ठेवून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, आपणांस नेमून दिलेल्या भागामधील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडून 85 वर्षावरील मतदारांना व दिव्यांग मतदारांना 12 डी चे अर्ज वाटप करणेचे कामकाज सुरू आहे. ते अर्ज भरून घेऊन त्यांचे गृह मतदान करावयाचे आहे. याकामाचा आढावा घेणेत यावा. तसेच सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेसाठी येणारे पथक यांचेशी समन्वय साधून निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल, याची दक्षता घ्यावी. नेमून दिलेल्या भागामधील मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथे सर्व किमान मुलभूत सुविधा आहेत किंवा कसे याबाबत खात्री करून संबधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना अहवाल सादर करावा. नेमून दिलेल्या झोनमध्ये असुरक्षीतमतदान केंद्र असतील तर त्याबाबत माहिती संबधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना देणेत यावी. नेमून दिलेल्या भागाच्या कार्यक्षेत्रापूरते विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्तीबाबत आदेश निर्गमित करणेची कार्यवाही सुरू असून लवकरच ते निर्गमित करणेत येतील असे ते यावेळी म्हणाले. नोडल अधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेले कामकाज त्यांचे अधिनस्त असलेले अधिकारी/ कर्मचारी यांचेशी योग्य तो समन्वय साधून पुर्ण करा.
बैठकीमध्ये जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले दिनांक 15 ऑक्टोबर पासून सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 जाहिर झाली असून त्याच दिनांकापासून आदर्श आचारसंहिता सुरू झालेली आहे. दिनांक 22 ते 29 ऑक्टोबर या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्र जमा करणेची मुदत आहे. त्यानंतर दिनांक 30 ऑक्टोबर रोजी छाननी होऊन वैध उमेदवारांची यादी जाहिर केली जाईल. दिनांक 04 ऑक्टोबर रोजी पर्यंत माघारीची मुदत असलेने त्या दिवशी सायंकाळी निवडणूक लढविणारे अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. बैठकीवेळी डॉ.संपत खिलारी यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीस सूरूवात केली.