कोल्हापूरमधील पोदार इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देते. शाळेचे धोरण विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक सुरक्षिततेवर केंद्रित आहे, जेणेकरून मुलगा आणि मुलगी दोघांनाही सुरक्षित आणि सकारात्मक वातावरणात शिक्षण घेता येईल.
शाळेच्या संपूर्ण परिसरात ९५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत, जे २४ तास शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात कार्यरत असतात. हे कॅमेरे कॉरिडॉर, वॉशरूमच्या बाहेरील भाग, तसेच शाळेच्या इतर प्रमुख भागांवर देखरेख ठेवतात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेच्या बसमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे आणि ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध आहेत.
शाळेतील कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना त्यांची चारित्र्य पडताळणी आणि पोलिस पडताळणी केली जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणाची खात्री दिली जाते. विद्यार्थिनींसाठी ‘निर्भया बॉक्स’ आणि ‘सखी सावित्री’ पेटी उपलब्ध करून देण्यात आली आहे, जेणेकरून त्या आपल्या समस्या मोकळेपणाने मांडू शकतात. मुलांच्या हितासाठी एक स्वतंत्र ‘बॉईज वेलफेअर कमिटी’ देखील स्थापन करण्यात आली आहे, ज्याद्वारे मुलांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येते.
शाळेत दर महिन्याला विद्यार्थिनींसाठी ‘गर्ल्स वेलफेअर मीटिंग’ आणि मुलांसाठी बॉईज वेलफेअर मीटिंग घेतली जाते जिथे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासंबंधी चर्चा केली जाते. शारीरिक शिक्षण विभागामार्फत मुला-मुलींना आत्मरक्षा आणि फिटनेसचे विशेष प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून ते संकटाच्या परिस्थितीत आत्मविश्वासाने सामना करू शकतील.
शाळेतील एम. आय. रूममध्ये विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येते. किशोरवयीन मुलींना शरीरातील बदलांविषयी प्रशिक्षित नर्सकडून मार्गदर्शन दिले जाते, ज्यामुळे त्यांच्या प्रश्नांची सोपी उत्तरे मिळतात.
प्राचार्या शिल्पा कपूर आणि उपप्राचार्या मनिषा आंब्राळे यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील शिक्षकवर्ग आणि विविध समित्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी समर्पितपणे कार्यरत आहेत. पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला आणि कल्याणाला समर्पित आहे, ज्यामुळे पालक आणि विद्यार्थी दोघेही विश्वासाने आणि निर्धास्त राहू शकतात.