कोल्हापूर ,ता. २७ (वार्ताहर) : केंद्रीय शिवसेना पक्षाचे उपनेते व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांची देशाच्या केंद्रीय गृह समिती सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.याची यादी केंद्र शासनामार्फत प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
दरम्यान,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वतीने सन २०२४- २५ साठी चोवीस संसदीय स्थायी समित्यांची स्थापना केली आहे.भाजपच्या प्रमुख मित्र पक्षांव्यतिरिक्त महाराष्ट्रातील त्यांचे मित्र पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रत्येकी एक समितीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदार धैर्यशील माने यांना देशाचे केंद्रीय गृह समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले.