कोल्हापूर दिनांक 9 – अलीकडेच संभाजी ब्रिगेडच्या मुंबई येथील अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आणि तमाम भक्तांचा रोष ओढून घेतला होता.त्यांच्या वक्तव्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होऊन ठिकठिकाणी त्यांच्याविरुद्ध आंदोलन सुध्दा झाले होते त्यामुळे सामजिक वातावरण बिघडले होते.परंतु बरेच दिवस उलटूनही ज्ञानेश महाराव याने कोणतीही माफी मागितली नव्हती.परंतु आज हिंदुत्ववादी स्वामीभक्त राजेश शिरवाडकर यांनी त्यांना गाठून कोणतीही मारहाण अथवा अनुचित प्रकार न करता महाराव याला माफी मागायला लावली.त्यानंतर महाराव याने जाहीर माफी मागितल्याचा व्हिडिओ सुध्दा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.