कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व युध्द विधवा (Battle Casulty)/ दिवंगत सैनिकांच्या पत्नी (Physical Casulty)/युध्द काळात व युध्द नसताना सैनिकी सेवेत मृत झालेल्या किंवा अपंगत्व येऊन त्यामुळे नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकांना व त्यांच्या पाल्यांनी शासकीय पदभरती करिता डेटा अद्यावत करावा. स्वत: आपले व आपल्या कुटुंबातील व्यक्तीचा तपशिल मूळ कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे दिनांक 21 ऑक्टोबर 2024 पूर्वी सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल डॉ भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.