कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत राष्ट्रिय मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी येथे गुरुवार दि. 10 ऑक्टोबर 2024 रोजी मानसिक आरोग्य व ताण तणाव व्यवस्थापन शिबीर सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत आयोजित केले आहे. या शिबीराचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सेवा रुग्णालयाच्या मानसोपचार तज्ञ डॉ. अर्पणा कुलकर्णी यांनी केले आहे.
शिबीरामध्ये स्किझोफ्रेनिया संशय येणे/विचित्र वर्तन/कानात आवाज, मेनिया/हर्षवायु/अती उत्साहीपणा, एक कृती वारंवार करणे/विचार कृती अनिवार्य विकृती, नैराश्य/उदासिनता/आत्महत्येचे विचार येणे, व्यसन (दारु, तंबाखू, मावा, गुटखा, मोबाईल, गेम), स्मृतीभ्रंश/विसरभोळेपणा, प्रसुतीपश्चात नैराश्य/उदासिनता, झोपे संबंधी समस्या, चिंता/भिती/काळजी वाटणे, एन्युरेशीस (वयाच्या ५ वर्षानंतरही अंथरुणामध्ये लघवी करणे), शाळेत जाण्याची भिती/शाळा बुडविणे, पटकन राग/चिडचिड करणे/हट्टीपणा, अभ्यासाचा कंटाळा / परिक्षेची भिती वाटणे, स्वमग्न/अतिचंचलपणा, एकलकोंडेपणा/आत्मविश्वास कमी होणे, ताण तणाव व्यवस्थापन यापैकी कोणतीही समस्या भेडसावत असल्यास या शिबीरामध्ये मोफत तपासणी, समुपदेशन व औषधोपचार मिळणार आहेत.