कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार, दिनांक 9 ऑक्टोंबर 2024 रोजी सायंकाळी 4.15 वाजता मौजे मानबेट ता. राधानगरी हेलिपॅड येथे आगमन. व मोटारीने धामणी मध्यम प्रकल्प, राई, ता. राधानगरीकडे प्रयाण. सायंकाळी 4.20 वाजता धामणी मध्यम प्रकल्पाच्या प्रथम टप्यातील घळभरणी कामाचा शुभारंभ. (स्थळ : धामणी मध्यम प्रकल्प, राई ता. राधानगरी जि. कोल्हापूर). सायंकाळी 4.30 वाजता मोटारीने मौजे मानबेट ता. राधानगरी हेलिपॅडकडे प्रयाण. सायंकाळी 4.35 वाजता मौजे मानबेट ता. राधानगरी हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने गारगोटीकडे प्रयाण. सायंकाळी 4.50 वाजता मौनी विद्यापीठ गारगोटी, कर्मवीर हिरे महाविद्यालय येथील हॅलिपॅड, ता. भुदरगड जि. कोल्हापूर येथे आगमन व मोटारीने गारगोटीकडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता राधानगरी- भुदरगड तालुक्यातील विविध शासकीय इमारत, प्रकल्पांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा (स्थळ : प्रांत कार्यालयासमोर गारगोटी, कोल्हापूर). सायंकाळी 6 वाजता मोटारीने दसरा चौक, कोल्हापूरकडे प्रयाण. सायंकाळी 6.45 वाजता कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ (स्थळ : दसरा चौक, कोल्हापूर). सायंकाळी 7.30 वाजता मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. रात्री 8 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.