कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, यांनी उघडकीस न आलेल्या माला विरुध्द व शरीरा विरुध्दचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणणेच्या अनुषंगाने सर्व पोलीस अधिकारी व अमंलदार यांना सुचना दिलेल्या आहेत.
हरिपुजापुरम नागाळा पार्क, कोल्हापूर येथे श्री अशिष अंबादास देशमुख, हे आपल्या कुंटुबासह राहतात. त्याचे घरामध्ये १० तोळे वजनाचे ६,५९,७५०/- रुपये किंमतीचे दागिणे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरी केले बाबत त्यानी शाहुपूरी पोलीस ठाणेस दिलेल्या तक्रारी प्रमाणे गुन्हा रजि न.८७७/२०२४ भा.न्या कायदा कलम ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा नोंद झालेला आहे. सदर गुन्हयाचा समांतर तपास करणे बाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पोलीस उप निरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अमंलदार यांना सुचना दिलेल्या होत्या .
सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरु असताना पोलीस उप निरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अमंलदार अमित सर्जे यांना गोपनीय बातमीदार यांचेकडुन बातमी मिळाली की, अशिष देशमुख यांचे घरातील चोरी ही ८ वर्षा पासुन त्याचे घरामध्ये कामास असलेली महिला नामे सिध्दवा लिंगापा गर्गद वय ४० सध्या रा. नागाळा पार्क कोल्हापूर हिने केलेली असल्याची खात्रीशीर माहिती मिळली. त्याप्रमाणे महिला अंमलदार यांचे करवी नमुद महिलेला ताब्यात घेवुन चौकशी केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली. तिचेकडे चौकशी करत असताना तिच्या हावभाव वरून तिने चोरी केलेली असल्याचा शंसय बळावल्याने पोलीस उप निरीक्षक जालिंदर जाधव यांनी पंचाचे समक्ष ती राहणेस असलेल्या घराची घर झडती घेतली असता, तिचे घरामध्ये चोरीस गेलेल्या दागिण्यांपैकी सोन्याच्या पाटल्या जोड एक, सोन्याचे बिल्वर नग ४, सोन्याचे टॉप्स जोड एक असा एकुण ७६.०३ ग्रॅम वजानाचे ४,९५,९५०/ रुपये किमंतीचे दागिणे मिळुन आले. सदरचे दागिन्या बाबत चौकशी करता ते तिने अशिष अंबादास देशमुख यांचे घरातीलच चोरलेले असल्याची कबुली दिली आहे… सदर महिला नामे सिध्दवा लिंगापा गर्गद वय ४० रा. मुळ पत्ता बेडसुळ ता. सौदत्ती जिल्हा बेळगांव सध्या रा. नागाळा पार्क कोल्हापूर हिला तसेच चोरीचे जप्त केलेले दागिणे पुढील तपासा करीता शाहुपूरी पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास शाहुपूरी पोलीस ठाणे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक साो कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार अमित सर्जे, कृष्णात पिंगळे, विलास किरोळकर, संजय पडवळ, बालाजी पाटील, एएचटीयु शाखेकडील महिला पोलीस अमंलदार तृप्ती सोरटे, प्रज्ञा पाटील व चालक हंबीर अतिग्रे यांनी केलेली आहे