कोल्हापूर, दि. १८: श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंचेवतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर अनुद्गार काढल्याने कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील सर्व स्वामी भक्तांच्या वतीने शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चाचा मार्ग दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा आहे. सर्व स्वामी भक्तांनी शुक्रवारी सकाळी 10.30 पर्यंत दसरा चौक कोल्हापूर येथे सहकुटुंब, सहपरिवार मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला अरुण गवळी, कुलदीप जाधव, सुहास पाटील, रमेश चावरे, धनंजय महिंद्रकर, गुरुदेव स्वामी, अमोल कोरे, प्रकाश सरनाईक आदी उपस्थित होते.