पुणे दि. 12 : गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने पिंपळे गुरव येथील 8 टू 80 उद्यानाच्या बाजूला प्रथम वृक्षमित्र अरुण पवार व डॉ भारती चव्हाण यांनी वृक्ष पालखीचे पुजन केले. गणेश वंदना दिगंबर राणे यांनी म्हणत सुरुवात केली. वृक्षदिंडी मध्ये मंडळाचे कोअर कमिटी सदस्य आण्णा जोगदंड यांनी आपल्या शर्टवर पर्यावरण जनजागृतीचा संदेश लिहीलेला शर्ट घालुन, कावळा म्हणतो काव,काव ,एकतरी झाड लाव असे म्हणत परीसर दणाणून सोडला ते सर्वाचे लक्ष वेधून घेत होते
तुकाराम महाराजांच्या भुमिकेत ह.भ.प रामदास साबळे होते तर किरण कांबळे यांनी डोक्यावर झाड, तोंडाला ऑक्सीजनचा मास्क लावून पर्यावरणाचा संदेश दिला.
वृक्षवल्ली आम्हां,सोयरे ,वनचरे” असे भजन म्हणत पर्यावरणाचे स्लोगन हातात घेऊन वृक्षदिंडी काढली वृक्षप्रेमीनी वृक्षदिंडीत फुगड्या खेळण्याचा आनंद घेतला.
कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ भारती चव्हाण या वेळी म्हणाल्या कि नागरीकांनी जगण्यासाठी, प्रगती साठी ,रस्ता वाढीसाठी वृक्षतोड केली आहे प्रत्येकाने ठरवले पाहिजे माझ्या मुळे वृक्षतोड, प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. परिवर्तनासाठी प्रत्येक घटकांनी सामाजिक बांधिलकी समजून वृक्षारोपण केले पाहिजे आणि वृक्षरोपण हे फक्त शासनाचेच काम नाही ते आपले काम आहे आपल्या कुटुंबासाठी आपल्या वेळातील 50% वेळ पर्यावरणासाठी प्रत्येकाने दिला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल ढासळ चालला आहे, प्रत्येकाने झाडे लावून जगवले पाहिजेत,आणि देशी झाडे लावली पाहिजेत असे मत मंडळाच्या अध्यक्षा डॉ भारती चव्हाण यांनी वृक्ष रोपनाच्या वेळी व्यक्त केले.
वृक्ष लागवड करून पर्यावरणाशी आदराने वागण्याचा सल्ला वृक्षमित्र अरूण पवार यांनी दिला.
ते म्हणाले कि आपल्या कुटुंबाला प्रमाणे निसर्गावर प्रेम करा,तुकाराम महाराजांनी म्हटल्या प्रमाणे “वृक्षवल्ली आम्हां,सोयरे ,वनचरे”या अभंगाप्रमाणे निसर्गाशी आदराने वागा , सर्वांनी वर्षभर, वृक्ष लागवड व संगोपन आपापल्या परीने चालू ठेवा,आजचे पर्यावरणाचे रक्षण म्हणजे उद्याच्या तरुण पिढीच्या ऑक्सिजनची सोय असे प्रतिपादन वृक्षमित्र अरुण पवार यांनी केले. वायु प्रदूषण ध्वनी प्रदूषण कमी करण्याचे आव्हान यावेळी वृक्षमित्र अरुण पवार यांनी दिले .त्यांनी सर्व 500 झाडे मोफत वृक्षरोपणासाठी मोफत दिले.
वृक्ष लागवडीमध्ये मराठवाडा जनविकास संघ एन्व्हायरमेंट कंजर्वेशन असोसिएशन तसेच तिरंगा क्रीडा मित्र मंडळ यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी मंडळाच्या अध्यक्षा डॉ भारती चव्हाण, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व वृक्षमित्र अरुण पवार . कोअर कमिटी सदस्य व पर्यावरण तज्ञ तानाजी एकोंडे,सचिव राजेश हजारे,भरत शिंदे, गोरखनाथ. वाघमारे,गुणवंत कामगार काळूराम लांडगे ,संगीता जोगदंड ,लक्ष्मण.इंगोले,अशोक सरतापे,संदीप पोलकम ,शिवाजी पाटील, श्रीकांत कदम,अण्णा गुरव होते .
चला मारु फेरफटका भजनी मंडळाचे किरण कांबळे निना मीना भाऊ दुधाळ कृष्णा परीट रमेश बंड हे होते तर गुरुदत्त भजनी मंडळ राजे राजू उभे विलास चोपडे ह भ प शामराव गायकवाड ,ह भ प राऊत महाराज, ह भ प कुदळे महाराज तसेच मुलांनी सिराजभाई, नंदकुमार धुमाळ ,अमोल लोंढे ,दत्तात्रय धोंडगे, सूर्यकांत कुरुलकर किशोर अटरगेकर, संदीप पाटील, संतोष नलावडे, सामाजिक कार्यकर्त्या अनिता पांचाळ ,सुरेश कंक, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब साळूके, आण्णा जोगदंड, महमशरीफ मुलानी,महेंद्र गायकवाड या गुणवंत कामगाराने केलेतर आभार श्रीकांत कदम यांनी मानले.