खरंतर स्वातंत्र्य पूर्वकाळातील भारताचे सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या लेखणीतून अवतरलेले हे काव्य…… आणि खरोखरच आपल्या कलानगरीतील कलाकारांनी काल रात्री एका दुःखद घटनेने या काव्यरचनेतील शब्द अनुभवले . होय, आज ९ ऑगस्ट … संगीतसूर्य श्री केशवराव भोसले यांचा जन्मदिवस पण त्याच्या आदल्या दिवशी रात्री प्रत्येक कलानगरीतील कलाकाराच्या जिव्हाळा स्थान असलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भस्मस्थानी पडले आणि काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले. ही घटना ऐकून करवीर नगरीतील प्रत्येक नागरिकाचा काळजाचा ठोका चुकला व सर्वत्र हळहळ व्यक्त होऊ लागली. आपल्या करवीर नगरीत असा एकही नागरिक सापडणार नाही की ज्याने केशवराव भोसले नाट्यगृह पाहिले नाही. करवीरचे राजर्षी श्री शाहू महाराज यांच्या प्रेरणेतून उभे राहिलेले हे नाट्यगृह अशा घटनेमुळे बेचिराख झाले ही एक अत्यंत मनाला वेदना देणारी घटना कोल्हापूरच्या इतिहासात घडली आहे. आमच्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशन मार्फत दरवर्षी एक जुलै रोजी घेण्यात येणारा लोकप्रिय कार्यक्रम डॉक्टर्स डे याने नुकतेच आपला रौप्य महोत्सवी डॉक्टर्स डे कार्यक्रम असोसिएशन चे अध्यक्ष डॉक्टर अमोल कोडोलीकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सात जुलै २०२४ रोजी याच संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह रंगमंचावर नेहमीच्या दिमाखदार स्वरूपात यशस्वीपणे सादर केला. आणि खरंच कोणी कल्पनाही करु शकणार नाही की बरोबर एक महिन्यानंतर अशी घटना घडेल व या रंगमंचावरील हा आमचा शेवटचा डॉक्टर डे कार्यक्रम असेल. डॉक्टर्स डे च्या 25 पैकी जवळजवळ वीस कार्यक्रम आम्ही या रंगमंचावर यशस्वीरित्या सादर केले आहेत. जणू हा रंगमंच आपल्या के एम ए च्या सर्व कलाकारांना दर वर्षी डॉक्टर डे दिवशी जसे साद घालत असे. आमच्यातील जुने कलाकार जसे डॉक्टर अजय केणी, डॉक्टर अजित कुलकर्णी, डॉ दिपक आंबर्डेकर डॉ अतुल्य पाटील,डॉक्टर उन्नती सबनीस, डॉक्टर रसिका देशपांडे, डॉक्टर संजय देशपांडे, डॉक्टर प्रिया शहा, डॉक्टर वृंदा कुलकर्णी, डॉक्टर शुभांगी जोशी, डॉक्टर मिलिंद तिवले, डॉक्टर शिरीष पाटील, सौ अनिता पाटील, डॉक्टर प्रसाद देसाई, सौ बिना अपराध, डॉक्टर श्रीया गाढवे हनमशेट्टी ,डॉक्टर अनघा कुलकर्णी,डॉक्टर विजय जाफळेकर, डॉक्टर सुश्रुत हर्डीकर डॉक्टर अमर जगताप, डॉक्टर प्रसाद मोटे, व अलीकडच्या काळातील डॉक्टर मैना शिंदे , डॉक्टर आलोक शिंदे, डॉक्टर स्नेहल दत्त खाडे, डॉक्टर शीतल पाटील, डॉ. इशा जाधव , डॉ अरुण देशमुख, डॉक्टर दीपा फिरके, डॉ मंदार पाटील, डॉक्टर आशुतोष देशपांडे (कल्चरल) व इतर आणि कित्येक वर्षे डॉ. अमर आडके यांच्या सोबत या बहारदार कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन करणाऱ्या डॉ.मंजिरी वायचळ व डॉ. संयुक्ता कुलकर्णी हे सर्व डॉ.अमर आडके व त्यांना सहकार्य करणारे डॉ. राजेंद्र वायचळ यांच्या तालमीत याच रंगमंचावर दिवसेंदिवस परिपक्व होत गेले. डॉक्टर्स डे या कार्यक्रमाची धुरा सुरुवातीपासून डॉक्टर अमर आडके सांभाळत आहेत. त्यांनी आपल्या कौशल्य व विशिष्ट प्रकारच्या शैलीने डॉक्टर्स डे कार्यक्रम उच्च शिखरावर विराजमान केला.आतापर्यंत झालेल्या पंचवीस पैकी 22 डॉक्टर डे कार्यक्रम डॉक्टर अमर आडके यांनी यशस्वीरित्या पार पाडले.आपण आज सर्वजण संकल्प करू की लवकरात लवकर ही वास्तु पूर्ण स्थापित करून परत आपल्या सर्व कलाकार रसिकांच्या स्वागतास दिमाखाने उभी राहील. शासन याकरिता आर्थिक निधी उपलब्ध करून देईलच पण लोकप्रतनिधींसह आपण सर्व करवीर निवासी फुल ना फुलाची पाकळी म्हणून या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी नक्कीच आर्थिक मदत करूया.
डॉ राजेंद्र वायचळ,ज्येष्ठ कार्यकारिणी सभासद-कोल्हापूर मेडिकल असोसिएशन.