कोल्हापूर दिनांक 8- पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिवपदी पुन्हा एकदा शिवराज नाईकवाडे यांची निवड करण्यात आली आहे.गतवर्षी नाईकवाडे यांनी चांगले काम करूनसुद्धा त्यांची बदली केल्याने कोल्हापूरची जनता नाराज होऊन त्यांची बदली रद्द करण्यासाठी रस्त्यावर उतरली होती.त्यावेळेस त्यांची राजकीय सूडबुद्धीने बदली करण्यात आल्याची चर्चा रंगली होती.नाईकवाडे यांची कारकीर्द स्वच्छ आणि पारदर्शी असल्याने त्यांची काहीना अडचण होत असल्याचे बोलले जात होते.त्यांनी देवस्थान समितीच्या बाबत चांगले निर्णय घेऊन भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे केलेल काम कोल्हापूरच्या जनतेने बघतीले होते.त्यामुळे एका शासकीय अधिकाऱ्याच्या बदलीसाठी क्वचितच कोल्हापूरकर रस्त्यावर उतरताना दिसते.परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा चांगल्या आणि योग्य अधिकाऱ्याची निवड केल्याचे समाधान कोल्हापूरच्या जनतेला मिळाल्याचे दिसते.त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेसुद्धा नागरिक कौतुक करत असल्याचे दिसत आहे.आता पुन्हा एकदा देवस्थान समितीत “शिवराज” येणार म्हणायला हरकत नाही.