कोल्हापूर दिनांक 5-नृसिंहवाडीतील पूरपरिस्थितीचा विचार राजकीय नेते खासदार आमदार नेते मंडळीनी करने गरजेचे बनले आहे. गेली दहा बारा दिवस झाले पाणी चढउतार होत आहे 2 ते 4 इंचापर्यंत पाणी वाढते उतरते असे होत राहीले तर परिस्थिती अवघड आहे. धरण परिसरातील पाऊस ही कमी झालेला आहे. पण पाणी उतरायचे नाव ही घेत नाही. असे कधी घडत नाही पण अलमट्टी धरणातील बॅकवॉटर मुळे घडत आहे हे 100% टक्के अलमट्टी धरणाच्या पुर्वी असा मोठा पुर येत नव्हता आणी पाणी ही इतक्या दिवस तुंबून रहात नव्हते नृसिंहवाडीत दत्त मंदिर ही इतक्या दिवस पाण्याखाली रहात नव्हते 1914 नंतर इतका मोठा महापुर हा 2005 नंतर सातत्याने येत आहे. या मुळे शिरोळ तालुक्यातील शेती, शेतकरी. व्यापारी, दुकानदार. जनावरे गोरगरीब जनता यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. आर्थिक नुकसान इतके होते की तीन चार वर्षे शेतकरी, व्यापारी पाठीमागे जातो आहे. सरकारी मदत तुटपुंजी असते नुकसान मोठे असते. शासकीय मदत आम्हास नको आहे. प्रत्येक वर्षी मदतीचे आमिष दाखवून आमच्या माथी महापुर आम्हास नको आहे. आम्हास नको आहे.महापुराचे नियोजन करा 2019- 2021-2024 पाच वर्षांत तीन वेळा महापुर आला हे आम्हास परवडणारे नाही आहे.या भागातील सर्वजण यातच अडकून रहायचे काय हीच ऊसाबर करत बसायचे का . ज्यांची जनावरे आहेत त्याचे हाल पहा जनावरांचे नियोजन करताना नाकीनऊ येते. घरेदारे सोडून सर्व कुटुंबाला घेऊन दुसरीकडे राहयला जायचे म्हणजे काय होते ते ज्याचे त्यालाच माहीत.त्यामुळे असे होऊन कसे चालेल यामुळे या परिसराची प्रगती कशी व्हायची महापुराचा फटका नृसिंहवाडी,कुरूंदवाड राजापूर, बस्तवाड,या परिसराला जास्त बसत आहे. या साठी या गावातील जनतेने ही यात मोठा सहभाग घ्यायला पाहीजे, बोलायला पाहीजे चर्चा ही झालीच पाहीजे नाहीतर आपले काय खरे नाही पाऊस सुरू झाल्यानंतर पुर यायला लागल्यावर चर्चा करायची पुर ओसरला की परत शांत व्हायचे असे चालणार नाही या परीसराचे भावी भविष्य अवलंबून आहे हे नक्की. पण उदासिनता दिसुन येत आहे. हे असे चालणारे नाही आहे.या परिसरातील ग्रामपंचायत, सहकारी संस्था, सामाजिक मंडळे, जि प सदस्य, प.स सदस्य. ग्रामपंचायत सदस्य, या सर्वानी जोरदार उठाव करून 15 ऑगष्ट ला या महापुर अलमट्टी धरणाच्या विरोधात ठराव करून महाराष्ट्र, कर्नाटक, शासनास पाठवायला पाहीजे या परिसरातील सर्वानीच विचार करणे गरजेचे आहे असे धनवडे यांनी आवाहन केले आहे.