कोल्हापूर दिनांक 3 -पंचगंगा नदीवर जिल्हा प्रशासन व महानगरपालिका यांच्या मार्फत “जिल्हा नियोजन” मधून 4 कोटी 80 लाख रु खर्च करून बॉटणीकल गार्डन उभा करत आहेत.मुळात रंकाळा नजिक राबविला जाणारा हा प्रकल्प “हुशार” अधिकाऱ्यांनी पंचगंगा नदीजवळ आणून जागतिक विक्रम केला आहे असे म्हणावे लागेल.सदरची जागा दरवर्षी न चुकता पाण्यात जाते हे माहीत असताना फक्त स्वतःचे हात “ओले” करण्यासाठी हा प्रकल्प इथे आणला काय?याची चर्चा आता रंगू लागली आहे.कोमनपाचे अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी लावलेली एक हजार झाडे पुराच्या पाण्यात गेली तरी काही होणार नाही असा केलेला “आधुनिक” दावा फोल ठरला आहे.आधीच महानगरपालिकेला असणाऱ्या बागांचा मेंटेनन्स जमत नसताना व पंचगंगा नदीभागात पिकनिक पॉइंट(बाग) असताना केवळ 100 मीटर वर नवीन बाग कशासाठी केली? उद्यान अधीक्षक तसेच या प्रकल्पाच्या सर्व अधिकाऱ्यांनी जनतेची मते का घेतली नाहीत?मनमानी कारभार करून झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? असा सवाल जनतेतून केला जात आहे.त्यामुळे सदर प्रकल्पाच्या मंजुरी सह संपूर्ण चौकशी होऊन झालेल्या नुकसानीची वसुली संबंधित अधिकाऱ्यांच्या कडून करून त्यांच्यावर जनतेच्या पैश्याचा अपव्यय केल्याचे गुन्हे दाखल का करू नयेत ?अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे यांनी केली आहे.दोन ते तीन महिने या जागेत काम चालू आहे पण पहिल्याच पुरात हे सर्व काम पाण्यात गेले आहे .1000 हजार झाडे या ठिकाणी पाण्यात बुडाली आहेत याला जबाबदार कोण?पूर बाधित जागा/ रेड झोन असतानाही या ठिकाणी प्रशासनाने पैसे खर्च केलेले आहेत व जनतेच्या पैशाचे नुकसान केले आहे. मुळात जुना बुधवार पेठ ,शुक्रवार पेठेला मैदान नाही या जागेत मैदान व्हावे म्हणून 20 वर्षे मागणी आहे पण महानगरपालिका म्हणते की मैदान करायला पूर येतो या जागेत, मग या ठिकाणी आता प्रशासनाला ही गार्डन कशी चालते ते पण पूर बाधित क्षेत्रामध्ये त्यामुळे जनतेची सरळ सरळ फसवणूक होत आहे. विकास झाला पाहिजे निधी आला पाहिजे पण तो योग्य जागेत वापरला जावा. त्यामुळे सदर प्रकल्पाबाबत सुशील भांदिगरें यांच्या नेतृत्वात जुना बुधवार पेठ,शुक्रवार पेठ येथील नागरिक आंदोलन उभा करून पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालण्याची मागणी करणार असल्याचे समजते.