कोल्हापूर दिनांक 30-मौजे आरोंदा येथील श्री देवी सातेरी भद्रकाली पंचायतन हे देवस्थान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे व्यवस्थापनेसाठी वर्ग असून, सदर देवस्थानच्या व्यवस्थापन समितीत गेली अनेक वर्षे विविध भ्रष्टाचार व गैरव्यवहार चाललेले असून त्याबाबत गेली अनेक वर्षे मुख्यमंत्री, अध्यक्ष व सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूर, देवस्थान व्यवस्थापन उपसमिती स्थानिक कार्यालय सावंतवाडी यांचेकडे विविध तक्रार अर्ज दिलेले आहेत. मात्र देवस्थान समितीच्या कार्यालयातील काही लोक आर्थिक प्रलोभनातून या श्री देवी सातेरी भद्रकाली पंचायतनाच्या स्थानिक देवस्थान व्यवस्थापन उपसमितीचे सल्लागार बनले आहेत. त्यामुळे या भ्रष्टाचार व गैरव्यवहाराविरुद्ध कोणतीही कारवाई झालेली नसून, कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार घडत आहे. तरी श्री देवी सातेरी भद्रकाली पंचायतनाच्या स्थानिक देवस्थान व्यवस्थापन उपसमिती विरुद्ध वेळोवेळी केलेल्या तक्रार अर्जांचे अनुषंगाने आपलेकडून १४ ऑगस्ट २०२४ पुर्वी कार्यवाही व कारवाई न झाल्यास नाईलाजास्तव दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी पासून आपले कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसावे लागणार आहे. सदर उपोषणामुळे होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल असे सूर्यकांत विठ्ठल नाईक यांनी तक्रार अर्जाद्वारे कळविले आहे.