कोल्हापूर दिनांक 27 – भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा दिनांक 28 रोजीचा कोल्हापूर दौरा रद्द करून पुढे ढकलण्यात आला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील गंभीर पूर परिस्थिती मुळे हा निर्णय घेण्यात आला असून आधीच पुराचा बंदोबस्त आणि उपाययोजना यांचा ताण असताना हा दौरा रद्द झाल्याने जिल्हा प्रशासनाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.राष्ट्रपती यांच्या दौऱ्यासाठी संपूर्ण प्रशासन जोरात कामाला लागले होते तशा अधिसूचना सुध्दा वेगवेगळ्या विभागाला जारी करण्यात आल्या होत्या परंतु आता मात्र हा दौरा रद्द झाल्याचे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.वारणा उद्योग समूहाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती उपस्थित राहणार होत्या.त्यामुळे जिल्हा प्रशासन पूर्ण ताकदीनिशी पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत पोचविण्यासाठी अधिक जोमाने सक्रिय होत आहे.तसेच पोलीस विभागाला सुध्दा पूरग्रस्त भागात ठिकठिकाणी बंदोबस्त करावा लागत असून पोलिसांना सुध्दा ताण कमी होऊन दिलासा मिळाला आहे.