कोल्हापूर दिनांक 25-पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या चारचाकी वाहनांचे चोरीचे गुन्ह्यांना प्रतिबंध करणे बाबत तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच दुय्यम अधिकारी यांना वाहन चोरीचे रेकॉर्डवरील आरोपी तसेच वाहन चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देवून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.
पोलीस अधीक्षक साो यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक, श्रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक संदिप जाधव, पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे, दिपक घोरपडे, सोमराज पाटील व रोहीत मर्दाने यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला. सदर तपास पथकामार्फत तांत्रीकदृष्ट्या तपास करुन व गोपनीयरित्या माहिती मिळवून चारचाकी वाहनांचे चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे प्रयत्न चालू असताना तपास पथकास खात्रीशिर गोपनीय माहिती मिळाली की, संतोष लाड व त्याचा साथीदार दर्शन जाधव यांनी वाडी रत्नागिरी येथील आल्टो कार गाडी चोरलेली आहे.
तपास पथकाने दि. 24.07.2024 रोजी आरोपी नामे 01) संतोष सचिन लाड, वय 24, रा. अहिल्याबाई होळकरनगर फुलेवाडी रिंगरोड कोल्हापूर व 02) दर्शन रमेश जाधव, वय 22, रा. शिवतेज तरुण मंडळाशेजारी दत्त गल्ली अहिल्याबाई होळकर नगर कोल्हापूर यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास केला असता त्यानी व त्यांचे इतर दोन साथीदारांनी मिळुन वाडी रत्नागिरी येथून कार चोरलेची कबुली दिली. त्यांचेकडून कोडोली पोलीस ठाणे, गु.र.नं.220/2024, भा.न्या. सं. कलम 303 (2) प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस गेलेली आल्टो कार गाडी नंबर MH- 02-BT-4717 ही जप्त केली. त्यानंतर त्यांचे साथीदार 03) आशितोष अमर कारंडे, वय 24, रा. महादेव नगर फुलेवाडी कोल्हापूर व 04) प्रतिक विलास पाटील, वय 22, रा. अहिल्याबाई होळकर नगर फुलेवाडी कोल्हापूर यांनाही ताब्यात घेतले. सर्वाकडे इकत्रित चौकशी केली असता त्यांनी सुमारे पंधरा दिवसापुर्वी भोगावती परीसरातून आणखीन एक आल्टो कार गाडी चोरुन ती साहिल मुल्ला यास स्क्रॅपकरीता विकली असलेचे सांगीतले. म्हणून 05 ) साहिल मौला मुल्ला, वय 26, रा. बी.डी. कामगार चाळ मस्जिद जवळ राजोपाध्येनगर कोल्हापूर यास ताब्यात घेवून त्याचेकडून करवीर पोलीस ठाणे गु.र.नं. 500/2024, भा.न्या. सं. कलम 303 (2) प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस गेलेले आल्टो कार गाडी नंबर MH-08-C-6571 चे स्क्रॅपकरीता कैलेले सुटे भाग जप्त करुन साहिल मौला मुल्ला यास ताब्यात घेतले आहे.
आरोपीकडून उघडकीस आलेले गुन्हे खालील प्रमाणे.
अ.नं.
1.
पोलीस ठाणे कोडोली
गु.र.नं. व कलम
जप्त माल 220/2024, भा. न्या. सं. कलम 303 (2)
80,000/- रु आल्टो कार गाडी नंबर
MH-02-BT-4717
2.करवीर
|500/2024, भा.न्या. सं. कलम 303 (2)
80,000/- रु आल्टो कार गाडी नंबर MH-08-C-6571 चे स्पेअरपार्ट
नमुद आरोपीत यांचेकडून एक आल्टो कार गाडी, एका आल्टो कार गाडीचे सुटे भाग व गुन्हा करणेकरीता वापरलेली अॅक्सेस मोपेड गाडी असा एकूण 2,00,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नमुद आरोपींना कोडोली व करवीर पोलीस ठाणे येथे त्यांचे कब्जात मिळालेले मुद्देमालासह हजर केलेले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक,महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संदिप जाधव पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे, दिपक घोरपडे, सोमराज पाटील, रोहीत मर्दाने, संजय पडवळ, अमित मर्दाने व हंबिरराव अतिग्रे यांनी केली आहे.