कोल्हापूर दि २० : गुड्स यार्ड (जीआरएमटी) मध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म शेड उभारण्यासाठी आणि इतर काही दुरुस्तीसाठी रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे.
रेल्वे बोर्डाकडून 12.72 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हुंडेकरी संघटनेचे नेते मोहन कलशेट्टी म्हणाले, साखर, खते, सिमेंट, औषधे असा करोडोचा माल गुड्स यार्डात येतो. हा माल चार ट्रॅकवर चढवला जातो. यापैकी तीन ट्रॅकवर शेड नाही. त्यामुळे मोकळ्या प्लॅटफॉर्मवर माल उतरवला की पावसात खराब होतो.”
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देऊन शेड, योग्य दिवाबत्ती, ड्रेनेजची सोय करण्याची मागणी करण्यात आली. येडगे यांनी हे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना दिले.