कोल्हापूर दि 13 – मे 2024 मध्ये दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकांऊटंट ऑफ इंडिया च्या वतीने घेण्यात आलेल्या सी ए परीक्षेत जुना बुधवार पेठेची सूपुत्री सौ स्नेहल ऋषिकेश काकरे- घोरपडे हिने कोल्हापूर जिल्ह्यातून 5 व्या क्रमांकावर उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केले आहे.गेली 4 वर्षे स्नेहल या परीक्षेची तयारी करत होती.तिच्या या यशाने जुना बुधवार पेठेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.जुना बुधवार पेठेतील पहिलीच सी ए होण्याचा मान स्नेहलला मिळाला आहे.स्नेहलचे वडील दीपक घोरपडे महानगरपलिकेत नोकरीस असून आई वृषाली गृहिणी आहे.सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या मुलीने सी ए सारखी अवघड परीक्षा 5 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन सर्वसामान्य तरुणाईला एक आदर्श घालून दिला आहे.जिद्द असेल तर यश पायाशी लोटांगण घालतेच त्यासाठी गरज असते ती प्रामाणिक प्रयत्नांची.या यशामध्ये मध्ये तिला आई-वडील पती व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.नुकतेच स्नेहलचे जुना बुधवार पेठेतील उद्योजक श्रीकांत काकरे व राजेंद्र काकरे कुटुंबीयांचे चिरंजीव ऋषिकेश काकरे यांच्याशी विवाह झाला आहे.