कोल्हापूर दि १२ : करनुर गावचे हद्दीमध्ये गुलाब बाबालाल शेख वय ६५ रा.करनुर ता.कागल जि. कोल्हापूर हे घरी जात असताना शेख मळयाजवळ दोन मोटर सायकल वरुन आलेल्या पाच ते सहा अज्ञात इसमांनी त्याचे डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले होते. सदर घडले प्रकारा बाबत त्यांचा मुलगा नामे असिफ गुलाब शेख यांनी दिले फिर्यादी वरुन कागल पोलीस ठाणे येथे गुरनं २७५/२०२४ बीएनएस कलम १०९,१८९ (२), १८९ (४), १९० (१) (२) (३) प्रमाणे खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणेत आला होता. गुलाब बाबालाल शेख यांचेवर सीपीआर रुग्णालयात उपचार चालु असताना ते दिनांक ११/०७/२०२४ रोजी पहाटे मयत झालेने सदर गुन्हयामध्ये खुनाचे कलम १०३ (१) प्रमाणे वाढ करणेत आले.
सदरची बाब ही गंभीर स्वरुपाची असलेने मा. पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साो, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सदर गुन्हयाचा समांतर तपास करणेकरीता योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले. मा. पोलीस अधीक्षक साो यांनी केले मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखेचे दोन स्वतंत्र तपास पथक तयार करुन सदर गुन्हयाचा तपास चालू केला.
सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट दिलेनंतर गुन्हा घडले ठिकाणाची भौगोलिक परिस्थीतीची माहिती घेवुन तांत्रिक तपासणी केली असता सदरचा गुन्हा हा दोन मोटर सायकल वरील अज्ञात सहा इसमांनी केलेचे निष्पण झाले. नेमलेल्या दोन पथकानी तांत्रिक तपासणी व गोपणीय माहितीव्दारे सदरचा गुन्हा हा अदया, सोम्या, पत्या व त्यांचे इतर तीन साथीदार यांनी केला असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली. मिळाले बातमी प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाने इचलकरंजी परिसरात वरील चार आरोपींना ताबेत घेवुन त्यांचे नांवे पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नावे १) प्रर्णोत शिवाजी धनवडे रा. कबनूर ता. हातकणंगले २) आकाश नरेश कांबळे रा. चंदुर ता. हातकणंगले ३) सौरभ दिनकर जाधव रा. चंदुर ता. हातकणंगले ४) सम्मेद विजय ऐनापुरे रा. चंदुर ता. हातकणंगले असे सांगितली. सदर आरोपीत यांचेकडे कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांचे सोबत ५) आदित्य प्रकाश कांबळे रा. चंदुर ता. हातकणंगले ६) सुशांत जरळी रा. हलकर्णी असे असल्याची माहिती दिली त्यांचेकडे गुन्हया बाबत विचारणा केली असता ते घोडा गाडी शर्यतीसाठी घोडा विकत घेणेकरीता मतीवडे गावी दि.०८/०७/२०२४ रोजी गेले होते त्याच संध्याकाळी ६.३० वाचे सुमारास घरी परत येत असताना शेख मळयाकडे जाणारे रस्त्यावर मयत इसमास आरोपीत यांची मोटर सायकल घासली त्यावेळी मयत व आरोपी यांचे मध्ये किरकोळ वादावादी झाली होती. त्या कारणातुनच वरील आरोपी यांनी संगनमत करुन गुलाब बाबालाल शेख यांचे डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करुन ते घटनास्थळावरुन मोटर सायकल वरुन पळुन गेले होते .सदर ताबेतील ४ आरोपी यांना पुढील कारवाईकरीता कागल पोलीस ठाणे येथे हजर केले असुन उर्वरित २ आरोपी यांचा शोध घेत आहोत.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित साो, अपर पोलीस अधीक्षक, श्री निकेश खाटमोडे- पाटील साो, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. आप्पासाहेब पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस निरीक्षक, श्री. रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक, श्री. सागर वाघ तसेच पोलीस अमंलदार सुरेश पाटील राम कोळी, विनायक चौगले, प्रविण पाटील, विनोद कांबळे, कृष्णात पिंगळे, संजय हुंबे, निवृती माळी, अशोक पवार यांनी केली आहे.