दोन्ही पोस्ट मार्टेम रिपोर्ट हाती..तपास सी.आय.डी. कडे वर्ग करण्याची मागणी होणार
कोल्हापूर दि 12 – भुदरगड तालुक्यातील जंगल वस्तीतील एका गावामध्ये प्रेमाच्या भानगडीत एका तरुणाचा मुलीकडच्या तरुणांनी त्या मुलाला अक्षरशः झाडाला बांधून मारहाण करून ठार मारले असताना संबंधित ग्रामीण रुग्णालयाच्या मेडिकल ऑफिसर ने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या अहवालाच्या चर्चेने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.संबंधित तरुण रात्री मुलीच्या घरी सापडल्याने त्या मुलीच्या संबंधित मुलांनी त्याला पकडून मध्यरात्री दाट जंगलात घाटामध्ये झाडाला बांधून मारहाण केली असल्याचे समजते.त्यानंतर संबंधित ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने त्या मुलाचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा अहवाल दिला होता.परंतु मृत तरुणाच्या नातेवाईकांनी मारहाणीत मृत्यू झाला असल्याचे सांगून त्यासाठी पुन्हा पोस्ट मार्टेम ची मागणी केली.त्याचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी सी पी आर मध्ये पुन्हा पोस्ट मार्टेम केल्यानंतर त्या तरुणाचा मृत्यू डोक्याला व छातीला मारहाण केल्याने झाला असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे समजते.त्यामुळे त्या डॉक्टरांनी या प्रकरणात गुन्हेगारांना पाठीशी घालून नेमका कोणाला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.त्यामुळे सदर डॉक्टर वर गुन्हा दाखल करून त्याचे निलंबन करून सदरचा गुन्हा तपासासाठी सी आय डी कडे वर्ग करण्याची मागणी एका संघटनेकडून केली जाणार असल्याचे समजते.सदर प्रकरणातील दोन्हीही पोस्ट मार्टेम रिपोर्ट संघटनेच्या हाताला लागले असून कारवाईसाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या असल्याचे समजते.त्यामुळे या प्रकरणात अजून “कोणाचा” हात आहे का याचीही माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे कळते.त्यामुळे आता पोस्ट मार्टेम करणाऱ्या डॉक्टर यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.त्यामुळे गोरगरिब अन्यायग्रस्त कुटुंबांना अशा निर्दयी डॉक्टरांच्या मुळे न्याय का मिळत नाही? त्यामुळे अशा डॉक्टरांची धिंड काढून चाबकाने फटके मारण्याची गरज निर्माण झाली आहे का? अशी चर्चा होताना दिसत आहे.त्यामुळे पोलिस अधीक्षक याबाबत काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.तसेच आरोग्य विभागाकडून सदर डॉक्टरच्या निलंबनाच्या कारवाईसाठी मागणी करणार असल्याचे समजते.