इचलकरंजी दि 9 – पोलिस मित्र असोसिएशनच्या वतीने रोटरी क्लब इचलकरंजी येथे 2023-2024 मधील इयत्ता 10 वी व 12 वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी- विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला जेष्ठ समाजसेवक गोविंदराव खटावकर,कार्यक्रमाचे मार्गदर्शक ॲड.सूर्यकांत पोवार हरित सेना महाराष्ट्र शासन सदस्य रविंद्र शिंदे, जेष्ठ नेते महेश सातपुते,प्रा.शंकरराव पुजारी,संजय मुळे आदी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेडल, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
इचलकरंजी शहर दिव्यांग मध्ये वरद विनोद कदम या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला याबद्दल वरदचा विशेष सन्मान ॲड.सूर्यकांत पोवार यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांनी पोलिस मित्र असोसिएशनच्या कार्याचा आढावा घेतला तसेच असोसिएशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्येक वर्षी आदर्श महिला पुरस्कार, शासनाचे अनेक उपक्रम जसे “झाडे लावा-झाडे जगवा “,मोफत आरोग्य तपासणी शिबीर, अनाथाश्रमात शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, महापुरुषांच्या जयंती साजरी करणे, अनेक कौटुंबिक वाद मिटविला अशा अनेक कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून बोलताना जिल्हा व सत्र न्यायालयाचे सरकारी वकील ॲड. सूर्यकांत पोवार यांनी विद्यार्थ्यानी अभ्यासात “खोका आणि ओका” ही पद्धत अवलंबून अभ्यासात लक्ष दिले पाहिजे.अभ्यास करताना पाठांतर आणि परिक्षेत त्याचे लिखाण यामुळे अपयशाला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही तसेच पालकांनी आपल्या मुलांना शैक्षणिक गरजेपुरता मोबाईल देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना कशात रुची आहे हे लक्षात घेऊन त्यांना याबाबत मार्गदर्शन केले पाहिजे.जितका विद्यार्थी यश-अपयशाला जबाबदार आहे तितकंच पालकाची पण जबाबदारी महत्त्वाची आहे असे सांगितले.प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जेष्ठ समाजसेवक गोविंदराव खटावकर यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी, फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांचा विचार डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण केल्यास कोणत्याच क्षेत्रात अपयश येणार नसल्याचे सांगितले. हरित सेना महाराष्ट्र शासन सदस्य रविंद्र शिंदे यांनी विद्यार्थ्यानी शिकण्यासोबतच इतर कलाही जोपासावी. फक्त उच्च शिक्षणाने माणूस मोठा अधिकारी होतो असेच नाही तर 12 वी नंतर प्रा.शंकरराव पुजारी यांनी स्टेनोग्राफर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरीमध्ये वर्ग 2 या महत्त्वपूर्ण पदाचा ही बहुमान मिळवता येतो असे सांगितले.विद्यार्थ्यानी आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे अशा क्षेत्रात उत्तुंग झेप घेत नावलौकिक करावा असे सांगितले.चौंडेश्वरी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन महेश सातपुते यांनी विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रात पालकांनी त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.तसेच संजय मुळे, पोलिस मित्र असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष सुनीता शेरीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. पोलिस मित्र असोसिएशनच्या या गुणगौरव कार्यक्रमाचे कौतुक सर्वच प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात केले.
या कार्यक्रमाचे आयोजन पोलिस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला राज्याध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे, राज्य सल्लागार मुरलीधर शिंदे, महिला शहर अध्यक्ष आशा वाघिरे, उपाध्यक्ष सरस्वती हजारे, सचिव संगीता रुग्गे यांनी केले यावेळी राज्य उपाध्यक्ष नियाज जमादार, टीम प्रमुख मिलिंद चव्हाण,महिला राज्य संपर्कप्रमुख रुपाली ठोमके, महिला जिल्हाध्यक्ष नंदा जगदाळे,शिरोळ तालुका अध्यक्ष राजश्री हंकारे, हातकणंगले तालुकाध्यक्ष उज्ज्वला कित्तुरे,सुनीता पवार, सविता पुजारी, शकुंतला पाटील, स्वाती जाधव,भाग्यश्री कुंभार,मीनाक्षी पाटील,तुळसा काटकर,प्रभावती गायकवाड,अथर्व हावळ,अमित कोरे आदी पदाधिकारी,सदस्य व टीम विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश गरगरटे यांनी केले तर आभार प्रदर्शन महिला सचिव संगीता रुग्गे यांनी केले.