कोल्हापूर – काही दिवसांपूर्वी रवींद्र शिंदे राहणार घुडणपीर दर्गा परिसर,छत्रपती शिवाजी चौक कोल्हापूर यांनी गोकुळ शिरगाव येथील एका लॉजमध्ये आत्महत्या केली आहे.रवींद्र शिंदे महाराणा प्रताप चौकातील एका मसाल्याच्या दुकानामध्ये काम करीत होते.त्याच परिसरात एक चहा-दूधवाला “गवळी” महाराणा प्रताप चौक महानगरपालिका परिसरातील दुकानामध्ये फिरून चहा द्यायचा.हे काम करत असताना तो फिरून मटका घेण्याचे काम करत असल्याचे समजते.त्यातून शिंदे यांची गवळीकडे खेळलेल्या मटक्याची उधारी झाली.त्यामुळे गवळी याने शिंदे यांच्या मागे पैश्याचा तगादा लावला होता.त्यानंतर त्याने त्या पैश्यावर व्याज लावायला सुरुवात केली.त्यातूनच गवळीने शिंदे यांच्या मुलाची दुचाकी काढून घेतली असल्याचे समजते.शिंदे यांची परिस्थिती हलाखीची होती.तरीसुद्धा गवळी नावाच्या या निर्दयी माणसाने शिंदे यांना आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचे बोलले जात आहे.तसेच जे लोक त्याच्याकडे मटका खेळत होते त्यांच्याकडून बरीच माहिती उजेडात येणार आहे.ज्यादिवशी शिंदे यांनी आत्महत्या केली त्यादिवशी गवळी याने शिंदे यांना भरमसाठ कॉल केले असल्याचे समजते.त्यातून आलेल्या नैराश्यापोटी शिंदे यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय निर्माण झाला आहे.गवळी याने या धंद्यातून अमाप बेहिशेबी संपत्ती मिळवली असल्याचे समजते.तसेच महानगरपालिके जवळ हाकेच्या अंतरावर असणाऱ्या त्याच्या दोन चहाच्या गाड्या बेकायदेशीररित्या सुरू असल्याचे समजते.त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी कारवाई करणार का?त्यामुळे गवळी याच्यावर शिंदे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पोलीस गुन्हा दाखल करून कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.तसेच काही सामाजिक संघटना सुध्दा याबाबत तक्रार करून कारवाईची मागणी करणार असल्याचे समजते.