कोल्हापूर दि २८ : शहरात गुरुवारी रिमझिम पाऊस झाला. शहरात दिवसभर वादळी वाऱ्यासह अंशत: ढगाळ वातावरण होते.
गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी, चंदगड या घाट परिसरातही हलका पाऊस झाला.
कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी 1 जूनपासून 153.6 मिमी पाऊस झाला असून त्यात सरासरी 314.5 मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात ५३.२ मिमी पाऊस झाला होता. दरम्यान, जिल्ह्यातील 15 धरण पाणलोट क्षेत्रात 1 जूनपासून 67 मिमी पाऊस झाला असून, गेल्या वर्षी हा पाऊस आजपर्यंत 12 मिमी इतका होता.
भारतीय हवामान खात्याने सातारा आणि पुणे जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. घाट परिसरातही मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे