कोल्हापूर दि २० : स्वरराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा. राजू दिंडोर्ले साहेब यांनी उपलब्ध करून दिलेल्या आपटे नगर येथील हॉलमध्ये योगशिक्षक, श्री. विठ्ठल हळिज्वाळे व सौ. गीतांजली हळिज्वाळे यांनी मोफत सुरू केलेल्या माऊली योग वर्गाचा लाभ आपटे नगर, साळुंखे नगर, सुर्वे नगर, क्रांतीसिंह नाना पाटील नगर, साने गुरुजी वसाहत या प्रभागातील योग साधक लाभ घेत आहेत.
स्वरराज चॅरिटेबल ट्रस्ट व माऊली योग वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आपटे नगर परिसरात योगाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी प्रभात फेरी काढण्यात आली.
या योगाचा प्रचार व प्रसार फेरीसाठी मनसे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक मा. श्री. राजू दिंडोर्ले साहेब योग शिक्षक विठ्ठल हळिज्वाळे योगशिक्षिका सौ. गीतांजली हळिज्वाळे यांच्यासह योगसाधक श्री. एम. डी. पाटील, किरण पंडित, ईश्वर पाटील, जालिंदर मगदूम, हरिदास वरुटे, अशोक सुतार, चेतन पाटील, यांच्यासह आपटे नगर, साळुंखे नगर, सुर्वे नगर, क्रांतीसिंह नाना पाटील नगर, साने गुरुजी वसाहत या प्रभागातील योग साधक तसेच नागरिक उपस्थित होते.