कोल्हापूर दि १४ : कोल्हापूर शहरातील शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध मसाज पार्लर बंद करण्याचे निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडून शाहूपुरी पोलिसांना देण्यात आले. शाहूपुरी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये स्पा व मसाज पार्लरच्या नावाखाली राजरोसपणे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती संघटनेला मिळाली आहे.यामध्ये स्टेशन रोड,बसंत बहार, व्हिनस कॉर्नर,कावळा नाका परिसर, दाभोळकर कॉर्नर परिसरात असे अवैध मसाज पार्लर सुरू असल्याचे सांगण्यात आले.बसंत बहार परिसरातील “Desire” ज्योती नावाची महिला सुमारे 20 ते 22 मसाज पार्लर धारकांची म्होरक्या असल्याचे बोलले जाते.अशा कृत्यामुळे आजूबाजूला ये जा करणाऱ्या महिलांना लज्जा उत्पन्न होऊन नाहक त्रास होताना दिसत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या व्यवसायाला पाठीशी घालणारी यंत्रणेतील कोण व्यक्ती आहे तिचा शोध घेणे गरजेचे आहे.त्यामुळे गजबजलेल्या शाहूपुरी हद्दीमध्ये “लोटस” दाखवून “नमस्ते” करून “जीवन” “नॅचरल” करत असलेल्या मसाज पार्लर,स्पा वर शाहूपुरी पोलीस कारवाई करणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.अन्यथा संघटनेकडून थेट संबंधित मसाज पार्लर च्या ठिकाणी आंदोलन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेने आपल्या परिसरात असे अवैध मसाज पार्लर सुरू असल्यास थेट संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलनचे धीरज रुकडे, प्रमोद कुर्ले, निकिता माने, अर्चना खानिवाले, सूर्यकांत वायदंडे, महादेव कापसे , जयश्री भाटे आदी उपस्थित होते