कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या अंतर्गत पाचगाव येथे असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात सन 2024-25 मध्ये इयत्ता 8 वी, 11 वी, व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक कोल्हापूर शहर व परिसरातील विद्यार्थ्यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाचे अधीक्षक किरण पाटील यांनी केले आहे.
वसतिगृहात अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय, इतर मागास व आर्थिकदृष्ट्या मागास, अपंग, अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक सोयीसुविधा पुरविण्यात येतात. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9764745072 व 9503376533 वर संपर्क साधावा.