कोल्हापूर दि 12-फॉर्म्युला थ्री रेसर आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयातील रूग्णांना फळं वाटप, पांजरपोळ संस्थेतील जनावरांना चारा वाटप, बालकल्याण संकुलाला धान्य प्रदान, तर मातोश्री वृध्दाश्रमात अल्पोपहाराचे वाटप झाले. शिवाय वृक्षारोपणसह विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा झाला. टीम केएमच्यावतीनं तेजस बोंगाळे, अभिषेक माने, अनिकेत तेवरे, प्रतिक बोडके, वृषभ ब्रम्हदंडे, आशिष सातपुते, स्वरूप जाधव, रोहीत गोटे, ओंकार जगताप, ॠषिकेश रायकर, अनिरूध्द इंगळे, सिध्दार्थ शिराळे, अभि भोसले या ग्रुपनं पांजरपोळ संस्थेतील जनावरांसाठी एक ट्रॉली चारा दिला. शिवाजी पेठ महाडिक प्रेमी ग्रुपच्यावतीनं छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात फळं वाटप करण्यात आली. डॉ. शिशिर मिरगुंडे यांच्या हस्ते तसंच शिवाजी पेठेतील इंद्रजित महाडेश्वर, सचिन पोवार, संग्रामसिंह जरग, विरेंद्र हारूगले, तुषार इंगवले, सतिश पाटील, विश्वास पोवार, निरंजन शिंदे, राहूल दळवी, किरण सुर्यवंशी, नंदू तिवडे, स्वप्निल जाधव यांच्या पुढाकारातून १ हजार रूग्णांना केळी आणि सफरचंदांचं वाटप करण्यात आलं. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलातील निराधार बालकांसाठी अभिजीत पाटील, रोहीत पोवार, आर्यनिल जाधव, आकाश माळी, प्रसाद पोवार, श्रीधर पाटील, स्वप्निल जाधव, सिध्दार्थ शिराळे, तेजस बोंगाळे यांनी १६० किलो धान्य प्रदान केले. शिवाय
कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले हॉस्पिटल मधील रूग्णांना कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सफरचंद आणि केळीचं वाटप करण्यात आलं.
घर आणि कुटुंबापासून दुरावलेले ज्येष्ठ नागरिक मातोश्री वृध्दाश्रमात आश्रयाला आहेत. कुटुंबापासून पारखे झालेल्या या वृध्दांना आनंद मिळावा, यासाठी चिखलीचे सरपंच रोहीत पाटील, अक्षय वरपे, भरत पेले, पिनु पाटील, तेजस बोंगाळे, पृथ्वीराज मोरे, योगीराज सुतार, ओंकार जगताप, श्रेयस इंगळे यांनी बेकरी पदार्थांचं वाटप केलं. तसंच विविध किस्से सांगून ज्येष्ठांची करमणूक केली. दरम्यान याच परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. तर दिव्यांगांना साहित्य वाटप बचत गटांसाठी ठेव योजना असे उपक्रमही आज पार पडली. दरम्यान कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त राजकारण, समाजकारण, सहकार, क्रीडा, शैक्षणिक, वैद्यकीय, शासकीय, सांस्कृतिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यामध्ये नामदार चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, संचालक विभीषण वाघ, तात्या मामा नागटिळे, सिद्राम मदने, सतीश सावंत, विजय महाडिक, माजी सामाजिक न्याय मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, इचलकरंजीचे माजी नगरसेवक अब्राहिम आवळे, क्रांती आवळे, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम सिंह कुपेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चौगुले, गोकुळचे माजी संचालक धैर्यशिल देसाई, माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम, रूपा राणी निकम, भाग्यश्री शेटके, प्रदीप उलपे, चंद्रकांत घाडगे, माधुरी नकाते, किरण नकाते, बाळासाहेब उधळकर, राजू यादव, अजित मोरे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, राहुल देसाई, शिरोळ कारखाना संचालक रणजीत कदम, कूरुंदवाड नगरपरिषदेचे नगरसेवक अजय भोसले, शिरोळचे डॉक्टर अरविंद माने, दादा कोळी, यांच्यासह भागीरथी महिला संस्थेच्या पदाधिकारी, महिला बचत गटाच्या सदस्या,
हिंदुत्ववादी संघटनेचे गजानन तोडकर, बंडा साळुंखे, शिवानंद स्वामी, दीपक देसाई, अनिरुद्ध कोल्हापुरे, अनिकेत पवार, योगेश केरकर, निरंजन शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. तर दूरध्वनीद्वारे सुद्धा आज अनेक मान्यवरांनी कृष्णराज महाडिक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार
देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, नाविद मुश्रीफ, संजय बाबा घाटगे, समृद्धी मोहोळ, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, समित कदम, कौस्तुभ गावडे,
केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार अनिल बोंडे, खासदार उदयनराजे भोसले, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी खासदार कपिल पाटील, माजी आमदार नितेश राणे, राजेश क्षीरसागर, अमित राजसाहेब ठाकरे, पूर्वा वळसे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे.