कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे 14 जून 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. महालेखाकार कार्यालय, लेखा व हक्कदारी महाराष्ट्र-I मुंबइचे अधिकारी, ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे निवृत्तीवेतन संबधित समस्या, आणि प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच निवृत्तीवेतनधारकांनी या अदालतमध्ये सहभागी होण्याचे आवाहन कोषागार अधिकारी अश्विनी नराजे यांनी केले आहे.