कोल्हापूर दि ८ : हातकणंगले 48 लोकसभा मतदार संघातील बुथ निहाय मतदान आकडेवारी तक्ता फेकस्वरूपात तयार करून ईव्हीएम छेडछाड केली असल्याचा चुकीचा संदेश विविध सामाजिक माध्यमांवरून पसरविला जात आहे. अशा प्रकारे कोणताही प्रकार झाला नसून संबंधित मतदान तक्ता खोटा असून त्यामध्ये छेडछाड करण्यात आली आहे. ज्यांनी कोणी हे कृत्य केले आहे त्यांचा तपास कोल्हापूर पोलीस घेत आहेत. अशा प्रकारचा कोणताही संदेश आपण फॉरवर्ड करू नका तसेच जर कोणी असे करीत असेल तर निवडणूक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर अथवा कोल्हापूर पोलिस कार्यालयात संपर्क साधा.