दोन्ही ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया शांततेत पूर्ण
कोल्हापूर, दि. ५ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शाहू शहाजी छत्रपती 1 लाख 54 हजार 964 मतांनी तर हातकणंगले मधून धैर्यशील माने 13 हजार 426 मतांनी विजयी झाले. दोन्ही लोकसभा मतदारसंघात दिनांक 7 मे रोजी मतदान झाले होते. कोल्हापूरमधून एकुण 23 उमेदवारांनी तर हातकणंगलेमधून 27 उमेदवारांनी निवडणूक लढवली.
47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रमणमळा व 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील शासकीय धान्य गोदाम इमारतींमध्ये शांततेत पार पडली. कोल्हापूर मतदारसंघांमध्ये निवडून आलेले शाहु शहाजी छत्रपती यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार धैर्यशील माने यांना संजय शिंदे यांच्या हस्ते विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मतमोजणी प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 271 चंदगड – मल्लिकार्जुन माने, 272 राधानगरी -वसुंधरा बारवे, 273 कागल – सुशांत बनसोडे, 274 कोल्हापूर दक्षिण – हरिष धार्मिक, 275 करवीर – वर्षा शिंगण, 276 कोल्हापूर उत्तर – संपत खिलारी, 277 शाहूवाडी – समीर शिंगटे, 278 हातकणंगले – शक्ती कदम, 279 इचलकरंजी – मोसमी चौगुले, 280 शिरोळ – मोहिनी चव्हाण, 283 इस्लामपूर – श्रीनिवास अर्जुन व 284 शिराळा – रघुनाथ पोटे यांनी काम पाहिले. कोल्हापूरसाठी मतमोजणी निरीक्षक रोहित सिंग व अतिरिक्त मतमोजणी निरीक्षक श्रीमती के.पोर्कोडी यांनी काम पाहिले. तर हातकणंगलेसाठी मतमोजणी निरीक्षक संदीप नांदुरी व अतिरिक्त मतमोजणी निरीक्षक मदन लाल नेहरा यांनी काम पाहिले. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी ठिकाणी व मतमोजणीबाहेरील सार्वजनिक ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, मतमोजणी अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी, कर्मचारी तसेच निवडणूक व मतमोजणी प्रक्रियेबाबत चांगली प्रसिद्धी दिल्याबद्दल माध्यम प्रतिनिधींचे आभार मानले.
४७ कोल्हापूरसाठी सहाही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी १४ मतमोजणी टेबलवरुन चंदगड २८, राधानगरी ३१, कागल २६, कोल्हापूर दक्षिण २४, करवीर २६ आणि कोल्हापूर उत्तरची २३ फेऱ्यातून मतमोजणी पूर्ण झाली.
४८ हातकणंगलेसाठी सहाही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी १४ मतमोजणी टेबलवरुन शाहूवाडी व हातकणंगले प्रत्येकी २४, इचलकरंजी १९, शिरोळ व इस्लामपूर प्रत्येकी २१ तर शिरोळसाठी २४ फेऱ्यातून मतमोजणी पूर्ण झाली. टपाली मतमोजणीसाठी 18 टेबल होते. आयोगाच्या सूचनांनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच-पाच व्हीव्हीपॅटमधील मतमोजणी करण्यात आली. यासाठी ४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी ३४९ तर ४८ हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी ३३७ कर्मचारी असे एकुण ६८६ कर्मचारी नियुक्त केले होते. या व्यतिरिक्त अतिरिक्त १० टक्के कर्मचारी दोन्ही ठिकाणी राखीव होते. दोन्ही ठिकाणी ६००-६०० पोलीस कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आले होते.
उमेदवार निहाय मिळालेल्या मतांची संख्या-
47 कोल्हापूर- शाहू शहाजी छत्रपती, (इंडियन नॅशनल काँग्रेस) – 754522 , संजय भिकाजी मागाडे, (बहुजन समाज पार्टी)-4002 , संजय सदाशिवराव मंडलिक, (शिवसेना)-599558 , संदिप भैरवनाथ कोगले, (देश जनहित पार्टी, अपक्ष)-2975 , बसगोंडा तायगोंडा पाटील, (भारतीय जवान किसान पार्टी)-1107 , अरविंद भिवा माने, (भारतीय राष्ट्रीय दल अपक्ष) -570 , शशीभूषण जीवनराव देसाई, (अखिल भारत हिंदू महासभा,अपक्ष)-651 , सुनील नामदेव पाटील, (नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी)- 633, संतोष गणपती बिसुरे, (अपनी प्रजाहित पार्टी)-639 , इरफान आबुतालिब चांद, (अपक्ष) -597 , कुदरतुल्ला आदम लतिफ, (अपक्ष) -467, कृष्णा हणमंत देसाई, (अपक्ष)-604, कृष्णाबाई दिपक चौगले (अपक्ष)-3063 , बाजीराव नानासो खाडे, (अपक्ष)-3512 , नागनाथ पुंडलिक बेनके, (अपक्ष)-1227 , माधुरी राजू जाधव, (अपक्ष) -3508 , मुश्ताक अजीज मुल्ला, (अपक्ष)-3824 , मंगेश जयसिंग पाटील, (अपक्ष)-653 , ॲड. यश सुहास हेडगे-पाटील, (अपक्ष)-2459 , राजेंद्र बाळासो कोळी, (अपक्ष)-1044 , सलीम नुरमंहमद बागवान, (अपक्ष)-335, सुभाष वैजू देसाई, (अपक्ष)-849 , संदिप गुंडोपंत संकपाळ, (अपक्ष)-544 तर नोटाला 5983 एवढे मत मिळाली. अवैद्य मतदान 844 तर टेंडर्ड मतदान 36 आहे. अशा प्रकारे एकुण 13 लाख 94 हजार 170 मतदान झाले.
48 हातकणंगले – रवींद्र तुकाराम कांबळे (बहुजन समाज पार्टी)-4033 , धैर्यशील संभाजीराव माने (शिवसेना)- 520190 , सत्यजित बाबासाहेब पाटील -सरुडकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)-506764 , इम्रान इकबाल खतीब, (पक्ष- बहुजन मुक्ती पार्टी)-3190 , डॉ. ईश्वर महादेव यमगर, (भारतीय लोकशक्ती पार्टी)-1537 , दिनकरराव तुळशीदास चव्हाण (पाटील), (अपक्ष)-679 , धनाजी जगन्नाथ गुरव (शिवारेकर) (लोकराज्य जनता पार्टी)-1061 , दादगोंडा चवगोंडा पाटील (वंचित बहुजन आघाडी)-32696 , रघुनाथ रामचंद्र पाटील (भारतीय जवान किसान पार्टी)-2174 , राजू उर्फ देवाप्पा आण्णा शेट्टी (स्वाभिमानी पक्ष)-179850 , शरद बाबुराव पाटील, (नेशनल ब्लॅक पँथर पार्टी)-1361 , संतोष केरबा खोत (कामगार किसान पार्टी)-1701 , अस्लम ऐनोद्दिन मुल्ला, (अपक्ष)-6111 , आनंदराव तुकाराम थोरात, (अपक्ष)-3499 , आनंदराव वसंतराव सरनाईक, (अपक्ष)-4955 , जावेद सिंकदर मुजावर, (अपक्ष)-1852 , लक्ष्मण श्रीपती डवरी (अपक्ष)-1009 , लक्ष्मण शिवाजी तांदळे, (अपक्ष)-4789 , प्रा. परशुराम तम्मान्ना माने, (अपक्ष)-4477 , मनोहर प्रदीप सातपुते (अपक्ष)-1066 , महंमद मुबारक दरवेशी (अपक्ष)-361 , अरविंद भिवा माने (अपक्ष)-424 , देवेंद्र नाना मोहिते (अपक्ष)-560 , राजेंद्र भिमराव माने, (अपक्ष)-940 , रामचंद्र गोविंदराव साळुंखे (अपक्ष)-618 , शिवाजी धोंडीराम संकपाळ (अपक्ष)-1392 , सत्यजित पाटील (अपक्ष)-3632 तर नोटाला 5103 एवढे मत मिळाली. अवैद्य मतदान 1258 तर टेंडर्ड मतदान 7 आहे. अशा प्रकारे एकुण 12 लाख 97 हजार 282 मतदान झाले.