कोल्हापूर, दि. 10 (जिमाका): एप्रिल २०२४ पासून कोल्हापूर कोषागार कार्यालयामार्फत प्रदान करण्यात येणारे सर्व निवृत्तिवेतन, वेतन, व इतर सर्व प्रकारची देयके रिजर्व बैंक ऑफ इंडियाच्या ई-कुबेर प्रणाली मार्फत अदा केली जाणार असल्याचे कोषागार अधिकारी अ.अ. नराजे यांनी कळविले आहे.
ई-कुबेर प्रदानासाठी बँक खाते क्रमांक व आयएफसी कोड क्रमांक बरोबर असणे आवश्यक आहे. ज्या बँकेच्या शाखेतून प्रदान स्विकारले जाणार आहे त्याच शाखेचा आयएफसी कोड असणे आवश्यक आहे अन्यथा देयके प्रणालीमार्फत पास होणार नाहीत.
ज्यांचा अकाउंट नंबर व आयएफसी कोड नंबर जुळत नाही अशा निवृत्तिवेतनधारकांनी कोषागार कार्यालयाशी तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी वेतन व इतर देयकांसाठी संबधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्या योग्य आयएफसी कोड नंबरसह संपर्क साधावा, असे आवाहनही श्रीमती नराजे यांनी केले आहे.