कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): सन 2023-24 या आर्थिक वर्षातील महसुली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन वाहन नोंदणी व त्या अनुषंगाने कर वसुली करुन शासकीय महसुल जमा होण्याकरीता राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालये व सर्व उप प्रादेशिक परिवहन कार्यालये दि.29 ते 31 मार्च 2024 या सार्वजनिक सुट्टी दिवशी सुरु राहणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी केले आहे.
शुक्रवार दि. 29 ते रविवार दि. 31 मार्च 2024 या तीन दिवसांच्या कालावधीत नवीन वाहन नोंदणी व त्याअनुषंगिक कर वसुलीचे कामकाज तसेच इतर परिवहन विषयक कामकाज जसे थकीत कर वसुली व खटला विभाग महसुल जमा होणारे कामकाज सुरु ठेवण्यात येणार आहे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.