कोल्हापूर दि २४ : दि. न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर, संचालित रा.ना. सामाणी विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा नुकताच संस्थेच्या राम गणेश गडकरी सभागृहात संपन्न झाला.
यावेळी उद्योजक मा. सौ. व श्री धनंजय संभाजी सराटे मा. सौ.व श्री .धीरज संभाजी सराटे व सराटे कुटुंबीय, व्यावसायिक मा.सौ .व श्री सुशील सुधाकर भांदीगरे, संस्थेचे सचिव मा. प्राचार्य पी. एस. हेरवाडे ,मा. एस .एस. चव्हाण( सहसचिव दि न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर .प्राचार्य सौ. स. म .लोहिया जुनियर कॉलेज व हायस्कूल, कोल्हापूर) मा. कुशल हेमराज सामाणी( अध्यक्ष स्कूल कमिटी रा. ना. समाणी विद्यालय, कोल्हापूर) मा. शशिकांत तांदळे, (मुख्याध्यापक, न्यू हायस्कूल मराठी शाखा, कोल्हापूर ) बालक मंदिर नंबर २.च्या (मुख्याध्यापिका , मा. सौ. अश्विनी कुलकर्णी) हे सर्व उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन विद्यार्थी व पालकांच्या सहकार्यातून साकारलेले अभ्यासपूर्ण शैक्षणिक साहित्य प्रदर्शन तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा बहारदार नृत्याविष्काराचा कार्यक्रम विशेष उल्लेखनीय ठरला. सर्व मान्यवरांनी शालेय कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
शाळेचे मुख्याध्यापक मा.मनोहर महादेव घोलपे यांच्या उत्कृष्ट नियोजनातून संपन्न झालेल्या या स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन स.शिक्षिका सौ सीमा चोपडे व सौ प्रीती काकडे यांनी केले तर आभार सहकारी शिक्षक श्री संतोष कुंभार व अमोल घोलपे यांनी मानले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक, विद्यार्थी उपस्थित होते.