कोल्हापूर दि १२: शिंगणापूर फाटा येथे सुरु असलेल्या पाईपलाईनच्या कामाला महापालिकेच्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे.
काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेचे पाणी चंबुखडी टाकीपर्यंत नेण्यासाठी पाईप जोडण्याचे काम कोल्हापूर महापालिकेने १ जानेवारीपासून हाती घेतले आहे. दोन-तीन दिवसांत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. आता शनिवारपर्यंत काम संपेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पाणीपुरवठा होत नसल्याच्या नागरिकांच्या अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. शिवाय, केएमसीने शिंगणापूर फाट्याचा एक भाग खोदून ठेवला आहे ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो.