कोल्हापूर दि ९
तिसंगी ता. गगनबावडा येथे असणाऱ्या दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या दीपक गुंडू कांबळे या शिक्षकाच्या एम ए आर्टस् च्या डिग्री प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली.
जिल्हा परीषद शिक्षण उपसंचालक यांच्याकडे सदर शिक्षकाच्या डिग्री प्रमाणपत्राच्या सत्यात पडताळणी बाबतची माहिती माहिती अधिकारात मागितली असता सदरची जबाबदारी ही संबंधित शाळेची असल्याचे कळविले असल्याचे समजते.तरी शाळेकडे व ग्रामविकास शिक्षण संस्थेकडे याबाबत माहितीची मागणी केली असता कसलीही माहिती शाळा व संस्था प्रशासनाने दिलेली नाही.त्यामुळे त्या डिग्री प्रमाण पत्राच्या सत्यते बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे शाळा प्रशासनाने याबाबत योग्य माहिती न दिल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वायदंडे,कोल्हापूर शहर अध्यक्ष रजत मुल्लानी उपस्थित होते.