कोल्हापूर दि ६-
१)सुदाम दादाराव जाधव, वय- ५० वर्षे, पद – (जिल्हा अधीक्षक) जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर, (वर्ग-१) सद्या रा. पुण्यप्रवाह सोसायटी, फ्लॅट क्रमांक ३०३, नागळा पार्क, कोल्हापूर. मुळ रा. खामसवाडी, ता.कळंब, जि. धाराशिव.
२)उदय लगमाना शेळके, वय- ४0 वर्ष, (वाहन चालक) जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर, (वर्ग -३) रा.कणेरीवाडी ता.करवीर जि.कोल्हापूर हे दोघे आरोपी असून
तक्रारदार यांची वडिलोपार्जित जमिनीची मालकी ही नजरचुकीने चुलत चुलते यांचे नावे लागली होती ती कमी करण्याकरीता म्हणजेच शेतीबाबतचा फाळणी उतारा(पोट हिस्सा)दुरुस्त करून तक्रारदार यांच्या मालकीची शेतजमीन तक्रारदार आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे अन्य सह हिस्सेदार यांच्या नावे लागणेकरता उपसंचालक भूमी अभिलेख, पुणे या प्रादेशिक कार्यालयाकडे २०१८ मध्ये अर्ज केला होता. या तक्रारदार यांच्या वरील प्रलंबित अर्जाची सुनावणी भूमी अभिलेख अधीक्षक, कोल्हापूर यांच्या समक्ष सुरू करणेबाबत उपसंचालक यांनी लेखी जिल्हा अधीक्षक यांना लेखी आदेशित केले होते.त्या सदर सुनावणी चा निकाल हा तक्रारदार यांच्या बाजूने देणेसाठी आलोसे क्रमांक ०२ यांनी स्वतः साठी ५,०००/-₹ व आलोसे क्रमांक ०१ यांचेसाठी १०,०००/-₹ असे मिळुन तक्रारदार यांच्याकडे एकूण १५,०००/-₹ ची लाचेची मागणी केली तसेच आलोसे क्रमांक ०१ यांनी तक्रारदार यांना आलोसे क्रमांक ०२ यांना त्यांनी मागणी केलेप्रमाणे पैसे दिले का असे म्हणून आरोपी क्रमांक ०२ यांनी मागणी केलेल्या लाच मागणीस संमती दिली. त्यानंतर तक्रारदार यांचेकडुन आलोसे क्रमांक ०१ यांनी १०,०००/-₹ व आलोसे क्रमांक ०२ यांनी ५,०००/-₹ स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी यांचेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक श्री.सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सापळा पथकामध्ये पोलीस निरीक्षक बापु साळुंके, पोलीस हेड कॉनस्टेबल विकास माने, सुनील घोसाळकर, प्रकाश भंडारे, सुधीर पाटील, सूरज अपराध, सचिन पाटील सहभागी होते.