कोल्हापूर दि ५- सुविधांच्या माहितीच्या ‘आरोग्य दिनदर्शिका २०२४’ चे प्रकाशन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख आणि संकल्प चे डॉक्टर पी एन कदम , ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांच्या हस्ते संपन्न झाले . यावेळी उपस्थित हदयस्पर्श कुटुंबप्रमुख पद्माकर कापसे,ज्येष्ठ लेखक लक्ष्मण द्रविड, डॉ. कविता बमणजोगी, अभिरुची चे प्रसाद जमदग्नी. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील सहभागी दवाखाने तसेच कर्नाटक येथील आरोग्य श्री योजनेत सहभागी दवाखाने विविध रुग्णवाहिका, तसेच विविध सामाजिक संस्था, सर्पमित्र ,आरोग्य सेवक, ब्लड बँक यांच्यासह आपत्त कालीन मदत करणारे कार्यकर्ते , शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचे पत्ते – भ्रमणध्वनी यांचा या ‘आरोग्य दिनदर्शिका २०२४ ‘ मध्ये समावेश आहे. आरोग्य पत्रकार राजेंद्र मकोटे – निवेदिका सीमा मकोटे यांनी त्याचे संपादन केले आहे . सलग चौदा वर्ष ही स्मरणिका हे आरोग्य दिनदर्शिका प्रकाशित केली जात आहे .