कोल्हापूर दि19:महाराष्ट्रातील तिघाडी सरकारमधील बिघडलेला समतोल दिसण्यास सुरू झाला आहे.भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा “लबाड लांडग्याचे पिल्लू” असा उल्लेख करून नव्या वादाला तोंड फुटले असून राष्ट्रवादी कडून संपूर्ण राज्यात पडळकर यांचा निषेध केला जात आहे.धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही.त्यामुळे धनगर आरक्षणाबाबत अजित पवाराना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. यापुढेही पत्र देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे,” असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.रोहित पवार यांनी या अश्या छोट्या नेत्यांना पुढे करून भाजपचे वरिष्ठ त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे भाजप मधील काही नेत्यांचा अजितदादा टीम ला असलेला विरोध पुन्हा एकदा समोर आला असून तो आता लांडग्यावर येऊन ठेपला असून पुढे तो कुठे जातो हे पाहणे महत्वाचे ठरेल.