कोल्हापूर दि 14:जुना बुधवार तालीम मंडळाने स्वखर्चाने “ओळख जुना बुधवारची” या पुस्तकाची संकल्पना समाजासमोर मांडून कोल्हापूरच्या पेठ संस्कृतीत जणू एक आदर्श घालून दिला आहे.या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला छञपती शाहूमहाराजांच्या सह अनेक मान्यवरांनी कौतुकास्पद संबोधन केले.अध्यक्षीय समारोप करताना अध्यक्ष रणजित शिंदे यांनी सर्वांचे यथोचित आभार मानून सदर पुस्तकाचा खर्च तालीम संस्थेने केला असला तर या पुस्तक विक्रीतून तरुण तरुणांना स्पर्धा परीक्षा तयारी करता यावी त्यातून विविध शासकीय विभागात उच्च अधिकारी पदावर भागातील मुलांची निवड व्हावी या भावनेतून अभ्यासिका सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.जुना बुधवार पेठेत तरुणांची संख्या लक्षणीय आहे,त्यामुळे हा एक चांगला समाजोपयोगी उपक्रम असून आपल्या लोकांच्या योगदानाचा इतिहास उराशी बाळगून भविष्याचा वेध घेण्यासाठी असे उपक्रम म्हणजे बुधवार पेठेसाठी योगदान दिलेल्या लोकांना ही खरी श्रद्धांजली म्हणावी लागेल.त्यामुळे भविष्यात असे अनेक उपक्रम राबविले जावेत अशी समाजभावना निर्माण होतात दिसत आहे.