कोल्हापूर दि 13:शतकी परंपरा लाभलेल्या जुना बुधवार तालीम मंडळाच्या वतीने “ओळख जुन्या बुधवारची” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.जुना बुधवार पेठेतील दिग्गजांनी दिलेल्या आपल्या योगदानाचा यथार्थ गौरव या पुस्तकातून करण्यात आला आहे.यामध्ये तत्कालीन नगराध्यक्ष दादासाहेब हळदकर,स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक बापूजी साळुंखे,ऍड महादेवराव आडगुळे,संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले हुतात्मा शंकरराव तोरसकर,दळवीज आर्टस् चे संस्थापक दत्तोबा दळवी आदींसह अन्य मंडळींचा इतिहास मांडला असून जुना बुधवार पेठेची कारकीर्द या पुस्तकातून जनतेसमोर मांडण्यात आला आहे.सदर पुस्तक लेखन प्रा दिनेश डांगे यांनी केली असून त्याकामी प्रवीण हुबाळे, राधिका वरेकर,श्रीधर निकम आदीनी त्यांना लेखनकामी मदत केली आहे.जुना बुधवार पेठेची 2200 वर्षापूर्वीची रोमन काळातील वस्ती असणारी ब्रम्हपुरीची माहिती सुद्धा या पुस्तकातून समोर आणली आहे.त्यामुळे जुना बुधवार पेठेचा हा उपक्रमाचे कौतुक होत असून यातून प्रत्येक पेठेचा इतिहास तमाम महाराष्ट्रभरतील जनतेपर्यंत पोचून कोल्हापूरची ऐतिहासिक पार्श्वभूमी लोकांना समजण्यास मदत होईल यात शंका नाही.या कार्यक्रमात आमदार जयश्री जाधव,ऍड महादेवराव अडगुळे,शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी टी शिर्के, विवेकानंद शिक्षण संस्थेचे अभयकुमार साळुंखे,प्रा दिनेश डांगे,माजी आमदार सुरेश साळोखे,जुना बुधवार तालीम मंडळाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांच्यासह जुना बुधवार पेठेतील असंख्य नागरिक उपस्थित होते.