कोल्हाकोल्हापूर दि 13:कोल्हापूर जिल्ह्यातील कुडीत्रे येथील यशवंत सहकारी बँक(कुंभी-कासारी) या सहकारी तत्वावर चालणाऱ्या बँकेच्या गैरकारभाराबाबत आज मनसेने आंदोलन करून विभागीय सह निबंधक यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.या तक्रारीमध्ये 3 वेळा केलेली नोकरभरती ही नियमबाह्य असून सदरची नोकरभरती मध्ये आरक्षण डावलून भरती केली गेली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे बँकेने अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जयोजने अंतर्गत सुमारे 500 बोगस कर्ज प्रकरणे केली असल्याचा आरोप केला आहे.तसेच बँकेने म्हैशीचा एकच गोठा 97 ठिकाणी दाखवून कर्ज उचलले असल्याचा आरोप केला आहे.तसेच 17 ठिकाणी एकच वीटभट्टी दाखवून कर्ज उचलले असल्याचा आरोप आहे.एकाच प्रोजेक्टवर केवळ नाव पत्ता बदलून शेकडो कर्ज प्रकरणे दाखवून बनावट सह्या मारून सदर कर्जाचे पैसे संचालकांनी लाटले असल्याचा संशय व्यक्त केला आहे.मुदत संपलेले संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली.तसेच बँकेच्या नोकरभरती मध्ये संचालक मंडळाच्या नातेवाइक मंडळींची भरती केल्याची यादी कर्मचारी व त्याचे संचालक यांच्याशी असलेल्या नातेसहित देण्यात आली आहे.या सर्व आरोपासोबत सबळ पुरावे मनसेने दिले असून जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे आणि अरुण काकडे विभागीय सहनिबंधक यांच्यासह यशवंत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संपुर्ण संचालक मंडळावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे.
सदरहू आंदोलनामध्ये सन्माननीय नेते प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे , शहर अध्यक्ष राजू दिंडोर्ले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील, नरेंद्र तांबोळी, प्रशांत मते, शरद जाधव, अमित बंगे , अरविंद कांबळे, अभिजित पाटील, विक्रम नरके, निलेश पाटील, अमर कंदले, अमर बचाटे, मोहसीन मुल्लाणी, प्रशांत माळी, नवनाथ निकम, सलीम बेनक नळी , सागर जोगी , संतोष कोळी, संतोष यादव, शशिकांत कोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सामील झाले होते.