कोल्हापूर दि 11:बावीसशेहे वर्षांचा सांस्कृतिक वारसा असलेल्या ब्रह्मपुरीच्या भूभागावर वसलेली जुना बुधवार पेठ ही कोल्हापूर शहराची मूळ व सुरुवातीची वस्ती.
* हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन धर्मीय व अठरा पगड जातींची राष्ट्रीय एकात्मता जपणारी पेठ.
* पुस्तकाचे लेखन व संपादन प्रा. दिनेश डांगे यांनी केले असून प्रविण हुबाळे, राधिका वरेकर, श्रीधर निकम, सत्यजीत आवटे, विराज पाटील व कै. प्रकाश शिंदे यांनी 2010 ते 13 या तीन वर्षांत केलेल्या अथक प्रयत्नातून पुस्तक साकारले.
* 2013 मध्ये जुना बुधवार तालमीच्या शतकोत्तर अमृत महोत्सवाच्या वेळी पुस्तक प्रकाशित होणार होते. परंतु काही अडचणींमुळे ते 13 सप्टेंबर 2023 रोजी हे प्रकाशित होत आहे.
* पुस्तक प्रकाशन आदरणीय शााहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार श्रीमती जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार सुरेशराव साळोखे, माजी महापौर अॅड. महादेवराव आडगुळे, प्राचार्य अभयकुमार साळुंखे व तालमीचे अध्यक्ष रणजीत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. 13 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.00 वा अभिषेक लॉन हॉल, ब्रह्ममपुरी येथे होणार आहे.
* पुस्तक निर्मितीचा उद्देश्य : अतिशय शुद्ध होता. आपल्या भागाची आपल्या भागातील लोकांना ओळख व्हावी शहरवासियांच्या मनात पेठेबद्दल वास्तव माहिती मांडावी हा उद्देश्य होता.
* कोणाबद्दलही आवेश किंवा आकस न बाळगता ‘जे जे उदात्त ते ते समोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
पुस्तकात एकूण नऊ अध्याय आहेत
अध्याय
1. थोडसे इतिहासविषयक :
1. कोल्हापूरचा गौरवशाली इतिहास, 2. जुना बुधवार पेठेचा इतिहास, 3. अशी आहे आमची पेठ (भौगोलिक माहिती), 4. शतकोत्तर अमृत महोत्सवी जुना बुधवार तालीम, 5. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी शिपुगडे तालीम, 6. जुना बुधवार पेठेवर शाहू महाराजांचा वरदहस्त, 7. गणेशोत्सव देखाव्यात सतत पुरस्कार मिळविणारी भागातील मंडळे.
2. पेठेतील श्रद्धास्थाने :
या अध्यायात पेठेतील मंदिरे, चर्च आणि मशिदींचा परिचय.
3. पेठेतील नवरत्ने :
1. गणपत बापूजी पोवार, 2. गंगाराम कांबळे, 3. दत्तोबा दळवी, 4. दादासाहेब शिर्के, 5. दादासाहेब हळदकर, 6. जयाबाई हवीरे, 7. जयसिंगराव दळवी, 8. शामराव साळोखे, 9. रामनाथ जठार.
4. पेठेचा अभिमान :
1. विठाबाई काळे (परिवर्तनवादी झुंजार कार्यकर्त्या), 2. समतावादी जलसा मंडळाचे संस्थापक यशवंतराव सुळगावकर, 3. शिल्पकार बाळ चव्हाण, 4. क्रांतीकारक अभिमन्यू कदम, 5. अमेरिकेला गेलेला पहिला युवक : प्रभाकर वरुटे, 6. प्रिटींग मशीन्सचे उत्पादक लक्ष्मण बजाजी शिंदे, 7. पैलवान आनंदराव डांगे, 8. फेटाबहाद्दर विश्वनाथ ठोंबरे, 9. सच्चा सामाजिक कार्यकर्ता : खलील पन्हाळकर, 10. सूरपती पाडुरंग सुतार, 11. चित्रकार भीमराव यादव, 12. उद्योजक, संस्थाचालक नगरसेवक बाबुराव मुळीक, 13. लावणीची नृत्यसमशेर माया जाधव.
5. पेठेचे वेगळेपण :
1. श्री लक्ष्मी उत्सव, 2. स्टार क्लब जुना बुधवार पेठेचे नाटक ‘खरा ब्राह्मण’, 3. जान से प्यारी स्मशानभूमी, 4. बंगडे यांचा नावेचा कारखाना, 5. तोरस्कर चौकातील नावेचा कारखाना, 6. म्हैशींची शर्यत, 7. अशोक भोईटे यांच्या दोन कविता, 8. पोवाडा जुना बुधवार पेठेचा, 9. बेकरीची पेठ जुना बुधवार पेठ, 10. मी शिवाजी पूल बोलतोय.
6. जुना बुधवार पेठेचे भूषण : हुतात्मा शंकरराव तोरस्कर
7. पेठेतील भजनी मंडळे : एकूण सहा.
8. माहिती मजेशीर
9. संदर्भ सूची
या पुस्तकामुळे काय साध्य होईल?
* निष्कर्ष *
1. आपल्या पेठेबद्दल निश्चितच सार्थ अभिमान वाटेल.
2. अरे अशी थोर माणसे आपल्या पेठेत होती? अरे अशी कर्तबगार युवा पिढी आपल्या पेठेत आहे? … तर मग आपणही आपल्या पेठेचे पाईक होऊया, असा भाव प्रत्येकाच्या मनात निर्माण होईल.
3. शहरवासियांच्या मनात पेठेबद्दल आदराचा भाव निर्माण होईल.
4. प्रत्येक पेठ आपली ओळख पुस्तक रूपाने मांडण्यास प्रवृत्त होईल.
* आवाहन *
अतिशय अल्प दरात पुस्तक विक्री कार्यक्रम स्थळी उपलब्ध असून
पेठेतील घराघरात हे पुस्तक असलेच पाहिजे असे आवाहन करण्यात येते.
यावेळी प्रवीण हुबळे, श्रीधर निकम, विराज पाटील, राधिका फराकटे, संग्राम पाटील, सुनील शिंदे, सुशील भांदिगरे, रणजित शिंदे, संतोष दिंडे, रवींद्र सावंत व राजू माने आदी उपस्थित होते.